बौद्धांनी आपल्या देवाऱ्यात महात्माफुले लावला परंतु ओबीसीने आपल्य घरात तरी फुले यांच्या फोटो लावा – पांजरे !

नागपूर :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्माफुले यांना आपला गुरु का मानले संपूर्ण बौद्ध समाजाने आपल्या देवाऱ्यात महात्मा फुले यांच्या फोटो लावुन पुज्य केले पंरतू आजपण कित्येक ओबीसींच्या देवाऱ्यत सोडा घरात फुले सावित्रीबाई नाही हि किती शोकांतिका आहे. असे प्रतिपादन ओबीसी नेते राजू पांजरे यांनी प्रांजळ कबुली दिली. ते आंबेडकरी विचार मोर्चा आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा च्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. ओबीसी नेते अशोकराव पेशने यांनी महात्मा फुलेंच्या छायाचित्रावर पुष्प अर्पण करून त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. जोतीबा महात्मा फुले यांच्या जिवन चित्रावर नामदेवराव निकोसे, तन्हा नागपूरी, प्रा.रमेश दुपारे, जयश्री मसराम, कमलेश मेश्राम, प्रा.के.एस. पानतावणे, यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमात हंसराज उरकुडे, सुलेखा सुर्यवंशी, अभिषेक मडावी, त्रिवेश कुंमरे, नितेश आत्राम, कार्तिक मसराम, अर्चना फुले, आकाश मसराम उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान

Tue Nov 29 , 2022
नवी दिल्ली :- महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्काराने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालया च्यावतीने वर्ष 2017, 2018, आणि 2019 साठीचे ‘शिल्प गुरू पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव रचना शहा, हस्तकला विकास आयुक्त व्यासपीठावर उपस्थित होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com