नागपूर :- प्रतिगामी,अवैज्ञानिक,अंधश्रद्धा, या अघोरी प्रथेला नष्ट करून समता, बंधुता न्याय तत्त्वाला धरून सत्यशोधक समाजाची निर्मिती हेच बहुजनांच्या हृदयात रुजू झाली पाहिजे या विचाराने महात्मा फुले यांनी संपूर्ण जीवन आत्मज्ञानाने प्रेरणा दिली आज त्यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या यशवंत स्टेडियम येथील कार्यालयात बौद्ध, ओबीसी, मुस्लिम, मागासवर्गीय मतदाता ऐक्य मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी मोर्चा चे अध्यक्ष राजु पांजरे हे होते आं रि मो चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी महात्मा फुले यांच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन केले प्रमुख वक्ते देवेंद्र बागडे, सुखदेवराव मेश्राम,प्रा.रमेश दुपारे यांनी फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसराज उरकुडे यांनी केले. पांजरे पुढे म्हणाले प्रतिगामी शक्तीचा प्रभाव कमी करणे हि काळाची गरज आहे यासाठी ओबीसी, मुस्लिम, मागासवर्गीय, बौद्ध समाजाने एका दिलाने पुरोगामी विचारसरणीचे काँग्रेस पक्षाचे, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा समर्थित उमेदवार विकास ठाकरे यांना मतदान देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करावे हा संकल्प करण्यात आला. विशेष म्हणजे पुरोगामी ब्राह्मण समाजाच्या कार्यकर्त्यांनी विकास ठाकरे यांना समर्थन जाहीर केले या प्रसंगी संतोष बरमभीया, राजु त्रिवेदी, राजेंद्र डोंगरे,लल्लू त्रिवेदी,अमित मिश्रा, रमेश शुक्ला,सेतु बघेल,शिवम मिश्रा, राजेश शर्मा, नवल किशोर, रघुवंश मिश्रा, ब्रिजेश पांडे,शुभम मिश्रा, राजेश तिवारी,कूष्कांत तिवारी,यांचे स्वागत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रमेश दुपारे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजु कांबळे यांनी केले.