बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनाने मानवी कल्याण – भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा धम्मसंदेश

नागपूर :-आंबेडकरी अनुयायांनी शिक्षणात क्रांती घडविली आहे. वाचन आणि लेखन हे समाजासाठी प्रेरणास्रोत ठरले आहे. प्रत्येक घरात बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आहे. मात्र वाचन किती अनुयायी करतात, हा संशोधनाचा विषय आहे. शोभेची वस्तू नाहीत, तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवीत असतात.

या धम्मग्रंथाने समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग सांगितला आहे. या मार्गावरून जाण्यासाठी प्रत्येकाने बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन करावे, प्रत्येकालाच प्रामाणिक जीवन जगणे सोपे होईल. मानवी कल्याण धम्मात सामावलेले आहे. भविष्याची दिशा या ग्रंथात असल्याचा धम्मसंदेश प. पू. डॉ. आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिला.

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला गुरुवार, २९ ऑगस्ट रोजी सुरेई ससाई यांनी इंदोरा विहार येथील निवासस्थानी हा धम्मसंदेश दिला. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा तथागत गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित ग्रंथ बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहिलेला अखेरचा ग्रंथ आहे. समानता हेच तत्त्व या धम्मात आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे या धम्माचे मध्यवर्ती सूत्र आहे. हे तत्त्वज्ञान त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातून सविस्तरपणे मांडलेले आहे.

मानवी समाजाला करुणेच्या डोहात तरंगायचे असेल तर प्रज्ञा, शील निर्माण करावी लागणार आहे. त्याचा शोध या ग्रंथात स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेची भावना या ग्रंथातून अधोरेखित होते. सत्य, अहिंसा आणि शीलाचे पालन करण्यासाठी धम्म आहे. हा धम्म जीवन जगण्याची शैली आहे. गौतम बुद्धांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर, समाजातील मौलिक प्रश्नांवर विवेचन करणारा हा ग्रंथ समग्र मानवास समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखविणारा आहे. प्रत्येकाने या ग्रंथाचे वाचन करावे, आवाहन भदंत ससाई यांनी केले.

अनुयायांनी धम्म कार्यात सहकार्य करावे

भिक्खू संघाला उद्देशून ससाई म्हणाले की, अलीकडे भिक्खू केवळ परित्राणपाठ करून चरितार्थ चालविण्यात व्यस्त आहेत. त्यांनी परित्राणपाठ घेण्यासह धम्माचा प्रचार, प्रसार करण्यावर भर द्यावा. आंबेडकरी अनुयायांना धम्म समजावून सांगितला पाहिजे. तेव्हाच त्यांच्या जीवनात प्रकाशाचे किरण पडतील, असेही ते अनुयायांनी धम्म कार्यात सहकार्य करावे. सुटीच्या दिवशी कुटुंबासह बुद्धविहारात जाऊन वंदनेत सहभागी व्हावे, अशी भावना भदंत सुरेई ससाई यांनी व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाद्रपद महोत्सव में गूंजेंगे भजन

Fri Aug 30 , 2024
नागपुर :-श्री रानी सती चैरिटेबल ट्रस्ट की ओर से श्री रानी सती भाद्रपद महोत्सव 2 व 3 सितंबर को श्री सतीधाम, श्री रानी सती मंदिर, न्यू नंदनवन ले आउट में मनाया जाएगा। ट्रस्ट की अध्यक्ष रमा खेमुक़ा ने बताया कि 2 सितंबर को चुनड़ी उत्सव दोपहर 3 बजे होगा। वहीं मंगलवार, 3 सितंबर को जात एवं पूजा सुबह 8 बजे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com