नागपूर :-भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनी नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने संविधान चौकात सकाळी 11 वाजता बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येईल.
बहुजन समाज पार्टी ही फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारावर चालणारी राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाची राजकीय राष्ट्रीय पार्टी आहे. या पार्टीची स्थापना बाबासाहेबांच्या जन्मदिनी 14 एप्रिल 1984 ला कांशीरामजी ह्यांनी केली. बाबासाहेबांची विचारधाराच या पक्षाचा जाहीरनामा असून बसपाने निळा ध्वज व हत्ती हे बाबासाहेबांचे बोध चिन्ह स्वीकारले आहे.
भारतीय संविधान खऱ्या अर्थाने अमलात आणणे हाच बसपाचा मुख्य उद्देश आहे. बाबासाहेबांच्या विचारावर अंमल करण्याची शपथ घेण्यासाठी 6 डिसेंबरला सकाळी 11 वाजता बसपाचे प्रदेश, जिल्हा, विधानसभा, सेक्टर, बूथ स्तरावरील सर्व प्रकारचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हीतचिंतकांनी पक्षध्वजासह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम व प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.
@ फाईल फोटो