बसपा तर्फे जयभीमप्रवर्तक लोकप्रिय बाबू हरदास यांच्या स्मूर्तीप्रित्यर्थ सामूहिक अभिवादन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नजीकचे सहकारी व “जयभीम” नाऱ्याचे जनक बाबू हरदास एल.एन. यांच्या 85 व्या निर्वाणदिनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने काल 15 जानेवारीला कन्हान नदीच्या तीरावरील बाबू हरदास यांच्या समाधीस्थळी बाबू हरदास एल. एन. यांना सामूहिक अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बहुजन समाज पार्टीचे सेंट्रल कॉर्डिनेटर व राज्याचे प्रभारी नितीन सिंग, प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोमारे, प्रदेश महासचिव व विदर्भ झोन इन्चार्ज सुनील डोंगरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य व विदर्भ झोन इन्चार्ज दादाराव उईके, राज्याचे सचिव व विदर्भ झोन इंचार्ज पृथ्वीराज शेंडे, यांनी नागपूर वरून पंधरा किलोमीटर अंतरावर कणा नदीच्या काठावर असलेल्या बाबू हरदास एल.एन. यांच्या समाधीवर जाऊन पुष्पचक्र अर्पित केले व “जयभीम” नाऱ्याचे जनक बाबू हरदास एल. एन.अमर रहे, अशा घोषणा सुद्धा दिल्या. सर्वप्रथम कामठी मध्ये पहिल्यांदा पदार्पण केल्याबद्दल प्रदेश प्रभारी नितीन सिंग व प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोमारे यांचे पुष्प मालेने स्वागत करण्यात आले. यावेळी पूर्व नागपूर जिल्हा प्रभारी व वरिष्ठ बसपा नेते किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी स्वतः हिंदी भाषेमध्ये लिहिलेला ग्रंथ “समाज क्रांति का नारा जयभीम बाबू हरदास की खोज” बसपा सेंट्रल कॉर्डिनेटर व प्रदेश प्रभारी नितीन सिंग यांना भेट दिला. याप्रसंगी प्रदेश प्रभारी नितीन सिंग व बस्पा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोमारे यांनी समता सैनिक दलाच्या शिबिराला भेट दिली. बसपा नेते मंडळी समाधी स्थळाकडे जातेवेळी वरिष्ठ बसपा नेते किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब, बसपा महिला नेत्या माया उके,मोहम्मद शफी, दिलीप भस्मे,कामठी शहर उपाध्यक्ष सुनिता रंगारी, निशिकांत टेंभेकर, समीर खान, प्रीतम खोब्रागडे सोबत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

Tue Jan 16 , 2024
*चंद्रपूर जिल्ह्यात होणार आयोजन*   नागपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लापूर तालुक्यातील विसापूर येथे 16 ते 18 फेब्रुवारी 2024 दरम्यान नागपूर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन होणार असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असल्याचे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत हा निर्णय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com