नागपूर :-1957 लाच दीक्षाभूमीवर बुद्धाचा पुतळा व धम्म स्तंभ उभारुन दीक्षाभूमीची जागा शासनाकडून मिळवून देण्यात अग्रेसर असलेले व 14 ऑक्टोबर 1956 च्या ऐतिहासिक धम्मदीक्षेला सुप्रीम कोर्टाद्वारे कायदेशीर मान्यता मिळवून देणारे बाबासाहेबांचे सहकारी, आमदार कायदेतज्ञ ऍड. बाबू हरदास आवळे यांचा 52 वा स्मृतीदिन बसपा ने अभिवादन व माल्यार्पण करुन साजरा केला.
कही हम भूल ना जाये; या अभियान अंतर्गत बहुजन समाज पार्टीच्या वतीने उत्तर नागपूरातील आवळेबाबू चौकातील (कमाल चौक) कर्मवीर व धम्मरक्षक असलेल्या आवळे बाबूंच्या पुतळ्याला नागपूर जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, नरेश वासनिक मा प्रदेश सचिव उत्तम शेवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने माजी नागपूर जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, माजी शहर प्रभारी योगेश लांजेवार, जेष्ठ कार्यकर्ते बुद्धम राउत, युवा नेते सदानंद जामगडे, मॅक्स बोधी, स्नेहल उके, राकेश जांभुळकर, अनवर अंसारी, विवेक सांगोळे, अनिल मेश्राम, साक्षी सोमकुवर, माजी नगरसेविका विरंका भिवगडे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर जिल्हा सचिव अभिलेख वाहाने यांनी तर समारोप उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष जगदीश गजभिये यांनी केला.