नागपूर :- यशवंत स्टेडियम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मशताब्दी स्मारक बनवावे तसेच मेडिकल चौकात छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा बसवावा या प्रमुख मागणीसाठी नागपूर जिल्हा बसपा ने मनपा कार्यालयासमोर निदर्शने करून मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी यांची भेट देऊन निवेदन सादर केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त 1991 ला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी स्मारकाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला होता. तसेच 2002 ला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णकृती पुतळा बसविण्याचा प्रस्ताव पास करण्यात आला. त्यानंतर मनपा व राज्यातही भाजपा-सेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांची सरकारे आली. परंतु त्यांनी याकडे हेतूत: दुर्लक्ष केले.
भाजप-सेना व इंका-राकाँ ची सरकारे महापुरुष विरोधी व जातीवादी असल्याचा ठपका ठेवून बसपा ने फुले शाहू आंबेडकरी विचारांचे सरकार बनवून स्वतःच महापुरुषांच्या स्मारकाला न्याय देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी बसपाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, राजीव भांगे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, शहर प्रभारी सुमंत गणवीर, विकास नारायने, मा मनपा पक्षनेते गौतम पाटील, माजी नगरसेवक संजय जयस्वाल माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, राजकुमार बोरकर, माझी शहराध्यक्ष योगेश लांजेवार, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, सदानंद जामगडे, महिला नेत्या सुनंदा नितनवरे, वर्षा वाघमारे, शालिनी शेवारे, नितीन वंजारी, जगदीश गजभिये, जितेंद्र मेश्राम, सुबोध साखरे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.