नागपूर :- मानवतेला कलंकित करणारी घटना मणिपुरात घडल्याचा व्हिडिओ समोर आल्याने बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर मणिपूर सरकारच्या निषेधार्थ निदर्शने केली. त्यानंतर नागपूर जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांना जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या नेतृत्वात प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव रंजना ढोरे, राजीव भांगे, मा प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हा महिला आघाडीच्या सुरेखा डोंगरे, आदिवासी नेते रोहित ईलपाची, एड. वीरेश वरखडे, नागपूर शहर प्रभारी सुमंत गणवीर यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांच्याकरिता निवेदन दिले.
निवेदनात पक्षपाती व जातीयवादी मणिपूर सरकार बरखास्त करावी, जाती व धर्माच्या नावावर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी. अन्यायग्रस्त व त्यांच्या कुटुंबीयांना 50-50 लाखाची आर्थिक मदत देऊन शासकीय संरक्षण प्रदान करावे. आदी मागण्या करून मागील दोन महिन्यापासून मणीपुरात बघ्याची भूमिका घेणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचाही याप्रसंगी जाहीर निषेध करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाचाही निषेध
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याच्या बेडग गावातील सरपंचाने गावातील कमानीवर केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव असल्याने त्या कमानीला 16 जून 23 रोजी बुलडोजरने जमीनदोस्त केले. ती कमान पूर्ववत बांधल्या जावी यासाठी स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य न मिळाल्याने आंबेडकरी समाजातील 150 परिवाराने आपल्या घराला कुलूपे लावून संपूर्ण परिवारासह व गुराढोरांसह न्यायासाठी मुंबई मंत्रालयाकडे पायी मार्च सुरू केलेला आहे.
आंबेडकरी अनुयायांना ती कमान पूर्ववत बांधून मिळावी, संबंधित जातीयवादी शासन, प्रशासनातील लोकांवर कारवाई व्हावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठवण्यात आले आहे.
आजच्या या निदर्शने कार्यक्रमात जिल्हा सचिव अभिलेष वाहाने, शहर प्रभारी विकास नारायणे, ओपुल तामगाडगे, शहर उपाध्यक्ष उमेश मेश्राम, आदिवासी समाजाचे नेते सोनू कोवे, कामगार नेते मिलिंद वासनिक, महिला नेत्या सुनंदा नितनवरे, वर्षा वाघमारे, विमल वराडे, संगीता नितनवरे, उत्तर नागपूरचे अध्यक्ष जगदीश गजभिये, योगेश लांजेवार, तपेश पाटील, युवा नेते सदानंद जामगडे, परेश जामगडे, अंकेश सहारे, राजेश गवई, विवेक सांगोडे, जनार्दन मेंढे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.