नागपूर :- नांदेडच्या बोंडार गावात आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून मनुवाद्यांनी अक्षय भालेराव ची दिवसाढवळ्या हत्या केली. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अक्षय भालेराव च्या कुटुंबाला संरक्षण व आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच भालेराव कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात यावी. दलित-आदिवासी समाजातील तक्रारकर्त्यांना विनाविलंब सुरक्षा देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यासाठी आज नागपूर जिल्हा व शहर बसपाच्या वतीने निदर्शने करुन राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण केल्यावर जिल्हाधिकारी परिसरात अक्षय भालेराव च्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, महाराष्ट्र शासन मुर्दाबाद, भालेराव कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आदि घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर नागपूर जिल्हाधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी पूजा पाटील यांनी निवेदन स्वीकारले, सदर निवेदन देशाच्या राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्या नावाने देण्यात आले.
शिष्टमंडळात प्रदेश महासचिव नागोराव जयकर, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी प्रा सुनील कोचे, शहराध्यक्ष सादाब खान, मा प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, शहर प्रभारी सुमंत गणवीर, विकास नारायने, ओपुल तामगाडगे यांचा समावेश होता.
याप्रसंगी उमेश मेश्राम, सदानंद जामगडे, जगदीश गजभिये, एड वीरेश वरखडे, जनार्दन मेंढे, अंकित थुल, विशाल बनसोड, धनराज हाडके, परेश जामगडे, अनवर अंसारी, हेमंत बोरकर, अजय गायकवाड, विवेक सांगोळे, प्रकाश शेवाळे, प्रशिक मून, पारस केळझरे, राहुल दामोदर, अनिल वाघमारे, राजेश बढेल, राहुल इल्पाची, संजय इंदूरकर, आदेश रामटेके, विनोद नारनवरे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.