नागपूर :-उत्तर नागपुरात मागील अनेक वर्षापासून सुरू असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राला मिहान मध्ये पळवण्याच्या मनुवादी षडयंत्राच्या विरोधात कामठी रोडवरील इंदोरा येथील हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेश द्वारावर हॉस्पिटल बचाव कृती समिती च्या माध्यमातून 26 नोव्हेंबर पासून जन आंदोलन सुरू आहे.
या सर्वपक्षीय जन आंदोलनात बसपा सक्रिय सहभागी असून आंदोलनाचा एक भाग म्हणून उद्या 30 नोव्हेंबर रोजी बसपाच्या वतीने सकाळी 11 वाजता पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत बसपाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव व नागपूर जिल्ह्याचे इन्चार्ज नागोराव जयकर यांच्या नेतृत्वात राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात भव्य धरणे व निदर्शने करण्यात येतील अशी माहिती बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मिडीया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली आहे.
हॉस्पिटल हा विषय सर्व सामान्यांच्या व गोरगरिबांच्या जीवनाशी संबंधित आहे या रुग्णालयाला 515 बेडची मान्यता व एक हजार कोटी रुपयाची मंजुरी मिळाली असून हे रुग्णालय अठरा माळ्याचे राहणार आहे. मिहान परिसरात आधीच एम्स असताना व उत्तर नागपुरात या रुग्णालयाची अत्यंत गरज असताना हे रुग्णालय पळवल्या जाऊ नये यासाठी बसपा ने नागपुरातील प्रदेश, जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर व बूथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांना मोठ्या संख्येने या जणांदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.