बसपाने महात्मा फुले यांना अभिवादन केले 

नागपुर – सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 131 व्या स्मृतिदिना निमित्त आज बहुजन समाज पार्टीद्वारे कॉटन मार्केट परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्र रामटेके, प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, जेष्ठ नेते उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी शिंगारे, शहराध्यक्ष राजीव भांगे, मनपा पक्ष नेते जितेंद्र घोडेस्वार यांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी बसपा नेत्यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे सामाजिक क्रांतीचे जनक व भारतीय शिक्षणाचे उद्गाते असल्याने फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात यावे अशी मागणी केली. फुले आपका मिशन अधुरा BSP करेगी पुरा,
महापुरुषके सम्मान मे बीएसपी मैदान मे, देश की मजबुरी है, फुले-शाहू-आंबेडकर जरुरी है, फुले दाम्पत्यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे, आदी गगनभेदी घोषणा देऊन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने नगरसेवक इब्राहिम टेलर, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, माजी पक्षनेते गौतम पाटील, नागपूर जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी, जिल्हा सचिव अभिलेश वाहने, नितीन वंजारी, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, माजी शहराध्यक्ष महेश शहारे, अमित सिंग, योगेश लांजेवार, जिल्हा महिला नेत्या सुरेखाताई डोंगरे, वर्षाताई वाघमारे, विमलताई वऱ्हाडे, आरोही डोंगरे, शहर प्रभारी शंकर थुल, उत्तर नागपूरचे अध्यक्ष राजरत्न कांबळे, मध्य नागपूर चे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण-पश्चिम चे माजी अध्यक्ष सदानंद जामगडे, सुरेंद्र डोंगरे, जगदीश गजभिये, महिपाल सांगोळे, विकास मून, विलास नारायणे,  संजय डहाट, प्रा सुनील कोचे, सचिन कुंभारे, जगदीश गेडाम, जिसान अली, राजेंद्र सुखदेवे, राष्ट्रपाल पाटील, बुद्धम् राऊत, ललन मेहता, प्रा आनंद भालेराव, एन आर उके, जितेंद्र पाटील, प्रशांत हातबुडे, बादल कठाणे, विकी कांबळे आदी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

विधानावर आयोजित प्रश्न मंजुषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Mon Nov 29 , 2021
रामटेक :श्री.नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक येथे राज्यशास्त्र, इतिहास तसेच राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास समितीच्या वतीने संविधान दिनानिमित्त दोन दिवसीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या  उपक्रमाचे उद्घाटन डाॅ.ओमप्रकाश आष्टनकर यांनीं केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे या होत्या. डॉ. ओमप्रकाश आष्टनकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की अलीकडे भारतात सर्व सामान्यांची लोकतान्त्रिक मुले पायदळी तुडवली जातील अशा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com