नागपूर :-बहुजन समाज पार्टीचे केंद्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी नितीन सिंह तसेच महाराष्ट्र प्रदेशचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष एड परमेश्वर गोणारे यांनी रामेश्वरी रोडवरील कांशी नगरातील बसपा च्या नागपूर शहर कार्यालयाला भेट दिली. कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन व केक कापून त्यांचे स्वागत केले.
बसपाचे संस्थापक मान्यवर कांशीराम यांनी नागपूर शहरात पक्षाच्या कार्यालयासाठी 1994 ला पंढरीनाथ वैद्य यांचे कडून जागा विकत घेतली होती. तिथे कार्यालय बांधल्यानंतर 1986 ला मायावती यांनी त्याचे लोकार्पणही केले होते. तेव्हापासून येथे बसपाचे नियमित कार्यालय सुरू आहे.
डॉ पंढरी वैद्य यांच्या निधनानंतर वैद्यच्या उर्वरित जागेवर एका बिल्डरची नजर गेल्याने बिल्डरने वैद्य परिवाराचा व बसपाचा तो प्लॉट हडपण्याचे षडयंत्र रचले. त्यात वैद्य परिवारातील दोघांचा बळी गेला. पुन्हा त्या कथित बिल्डरने गुंडागर्दी सुरू केल्याने बसपा ने त्याची पोलीस आयुक्ताकडे नुकतीच तक्रार केली आहे. या जागेची व प्रकरणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी बसपा नेत्यांनी या कार्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली. याप्रसंगी बसपा नेत्यांनी गुंडागर्दीचा बंदोबस्त कायद्याने करण्याचे अभिवचन दिले.
यावेळी त्यांचे सोबत जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, माजी प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे, शहर उपाध्यक्ष अमित सिंग, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, शहर प्रभारी विकास नारायणे, सुमंत गनवीर, इंजि नितेश कांबळे, माजी नगरसेवक अजय डांगे, महिला नेत्या सुनंदा नितनवरे, वर्षा वाघमारे, विमल वराडे, दक्षिण पश्चिमचे अध्यक्ष शिवपाल नितनवरे, दक्षिणचे अध्यक्ष नितीन वंजारी, दक्षिणचे प्रभारी शंकर थूल, महासचिव विलास मून, संभाजी लोखंडे, विनोद नारनवरे, सुमित जांभुळकर, सुंदर भरावी आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.