नागपूर :- संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ आज नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने संविधान चौकात धरणे निदर्शने करण्यात आली. अमित शहा यांनी संसदेमध्ये बहुजनांचे मसीहा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला. त्यामुळे त्यांनी जनतेची सार्वजनिक रित्या माफी मागावी. व पार्लमेंटच्या कामकाजातून ते शब्द वगळावेत यासाठी दिवसभर मनुवादी अमित शहा व भाजपा सरकार मुर्दाबाद च्या घोषणा देऊन त्यांचा निषेध करण्यात आला.
बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या दिशा निर्देशानुसार राष्ट्रपती महोदया यांच्या नावाने नागपूर जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेशचे पृथ्वी शेंडे, नागोराव जयकर, उत्तम शेवडे, जिल्ह्याचे योगिराज लांजेवार, रंजना ढोरे, राजकुमार बोरकर, चंद्रशेखर कांबळे, इब्राहिम टेलर, रामकुमार गोणेकर, उमेश मेश्राम, रोहित वालदे, प्रिया गोंडाने, तारा गौरखेडे, मंगला लांजेवार, सुमंत गणवीर, गौतम पाटील यांचा समावेश होता.
संविधान चौकात झालेल्या धरणे निदर्शने कार्यक्रमात सुनंदा नितनवरे, वर्षा सहारे, अभिलेश वाहाने, भीमराव गजभिये, नरेश वासनिक, कृष्णाजी बेले, राहुल सोनटक्के, भंते संघरत्न, आकाश खोब्रागडे, सावलदास गजभिये, अंकित थुल, सुरेंद्र डोंगरे, मुकेश मेश्राम, अजय उके, जितेंद्र पाटील, सुमित जांभुळकर, विकास नारायणे, सदानंद जामगडे, रुपराव नारनवरे, आशिष फुलझेले, साधना काटकर, माया उके, प्रिया ढोके आदींनी अमित शहा यांचा जाहीर निषेध केला.
आज दक्षिण भारतातील महान समाज क्रांतिकारक पेरियार रामस्वामी नायकर यांचा 51 वा स्मृतिदिन असल्याने त्यांच्या फोटोला माल्यार्पण करून या धरणे निदर्शने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या फोटोला जोडे मारत मारत अग्नीच्या स्वाधीन करून स्वर्गात पाठवले त्याची चर्चा फारच रंगली होती.