नागपूर :- बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने 73 व्या संविधान दिन निमित्ताने आज महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी एडवोकेट सुनील डोंगरे, प्रदेश सचिव रंजना ढोरे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांच्या नेतृत्वात संविधान चौकात संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण केल्यावर बसपा चे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांच्या माध्यमातून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
संविधान के सन्मान में बीएसपी मैदान मे, संविधान की रक्षा कोन करेगा हम करेंगे हम करेंगे, संविधान दिन चिरायु हो, महापुरुषो के सन्मान में बीएसपी मैदान मे, व्होट हमारा राज तुम्हारा नही चलेगा नही चलेगा, तख्त बदल दो ताज बदल दो बेईमानो का राज बदल दो, केंद्र सरकार होश में आओ संविधान से मत टकराओ, जो बहुजन की बात करेगा वह दिल्ली से राज करेगा, जयभीम का नारा गुंजेगा भारत के कोने कोने मे, बीएसपी की क्या पहचान नीला झेंडा हाथी निशान, बाबासाहेब का सपना अधूरा बीएसपी करेगी पुरा, बहनजी आप संघर्ष करो हम आपके साथ है, आदि उत्साह वर्धक घोषणा देत देत सन्मान रैली संविधान चौक परिसरात फिरली.
रॅलीत प्रामुख्याने बसपाचे माजी नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, संजय जयस्वाल, इब्राहिम टेलर, अजय डांगे, गौतम पाटील, देवेंद्र वाघमारे, तसेच महिला नेत्या सुरेखा डोंगरे, डॉक्टर मोनाली पोफरे, रत्नमाला माटे, वर्षा शहारे छाया सोमकुवर, महेश सहारे, राजू चांदेकर, अविनाश नारनवरे, योगेश लांजेवार, राजकुमार बोरकर, विलास सोमकुवर, अभिलेख वाहने, मुकेश मेश्राम, आशिष फुलझेले, सनी मून, जगदीश गजभिये, प्रवीण पाटील, जितेंद्र मेश्राम, गौतम गेडाम, नितीन वंजारी, सदानंद जामगडे, राजरत्न कांबळे, ऍड ध्रुव मेश्राम, सचिन मानवटकर, चंद्रशेखर कांबळे, ऍड विलास राऊत, ऍड भुवनेश्वर उके, ऍड सुरेश शिंदे, रोहित वालदे, बुद्धम राऊत, राजरत्न कांबळे, संभाजी लोखंडे, विकास नारायणे, विवेक सांगोडे, राजेश नंदेश्वर, सुनील सोनटक्के, प्रताप तांबे, जगदीश गेडाम, अरुण शेवडे, वीरेंद्र कापसे, चंद्रसेन पाटील, सावलदास गजभिये, शामराव तिरपुडे, अनिल मेश्राम, श्रीकांत बडगे, सुमित जांभुळकर, विद्यार्थी शेवडे, मॅक्स बोधी, परेश जामगडे, अमित बागेश्वर आदि प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.