नागपूर :- बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रमुख, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष, धम्मसेना नायक व जागतिक कीर्तीचे बौद्ध भिक्षू भदंत सुरेई ससाई यांना आज त्यांच्या जन्मदिना निमित्त त्यांचे निवासस्थान असलेल्या इंदोरा बुद्ध विहारात बसपाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी मान्यवर कांशीराम यांचे सहकारी असलेले दिल्ली निवासी सीनियर मिशनरी अजित गौतम, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मिशनरी गायक सत्विंदर सिंग आझाद, चेन्नईचे सामाजिक कार्यकर्ते रथनम यांच्या सोबतच शुभेच्छा देणाऱ्यात प्रामुख्याने बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या सुरेखाताई डोंगरे, वर्षा वाघमारे, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, शहर प्रभारी विकास नारायणे, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, उत्तर नागपूरचे प्रभारी योगेश लांजेवार, माजी मनपा पक्षनेते गौतम पाटील, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, सदानंद जामगडे, उत्तर नागपूरचे अध्यक्ष जगदीश गजभिये, महासचिव विवेक सांगोळे, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, सचिव बालचंद्र जगताप, मध्य नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील, वामन सोमकुवर, बुद्धम राऊत, परेश जामगडे, राजेंद्र सुखदेवे, सुबोध साखरे, माणिक लोणारे यांच्या सहित मोठ्या संख्येने बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.