– जनता भाजपच्या दादागिरीला कंटाळली- ऍड ताजणे
नागपूर :- महाराष्ट्रातील जनता काँग्रेस-राष्ट्रवादी च्या चालढकल नीतीला व भाजप-सेनेच्या दादागिरीला कंटाळली आहे. त्यामुळे बहुजन समाज बसपा कडे सक्षम पर्याय म्हणून पाहत आहे. बसपा ने राज्यात 25 विधानसभा व 7 लोकसभा जिंकण्याचे निश्चित केले असून त्यासाठी विदर्भावर फोकस केला आहे. असे मत महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रदेशाध्यक्ष ऍड संदीप ताजणे यांनी आज रविभवन येथील पत्र परिषदेत व्यक्त केले.
ऍड ताजने पुढे म्हणाले की 2004, 2009 व 2014 ला बसपाची राज्यात जी स्थिती होती ती भरभराटीची स्थिती पुन्हा 2024 ला दिसेल. एका प्रश्नाच्या उत्तरात ताजने म्हणाले की 2019 ला आंबेडकरी समाजाने भावनेच्या भरात जी चूक केली ती चूक दुरुस्त करेल व त्यासाठी बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्याचा व हत्तीचा सन्मान करण्यासाठी त्याला भरभरून मतदान करेल.
ओबीसी च्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ताजने म्हणाले की अजूनही त्यांना आपला मित्र व शत्रू ओळखता आला नाही, आम्ही त्यांना प्रबोधनाच्या माध्यमातून ती ओळख पटवून देत आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ओबीसीतील सुशिक्षित वर्ग बसपा सोबत जुळत आहे.
बसपा ने पक्ष बांधणीवर जोर दिला असून प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे 10 बूथ ची म्हणजेच 100 लोकांची जबाबदारी देण्यात आली असून वरिष्ठ त्यांच्या कार्यावर लक्ष ठेवून आहेत. त्याचाच भाग म्हणून मागील चार दिवसापासून नागपूर जिल्ह्यात विधानसभा स्तरावर संगठन समीक्षा बैठका व कार्यकर्ते मेळावे सुरू आहेत.
मणिपूर सहित देशात सुरू असलेल्या अन्याय अत्याचार व हिंसाचारा बाबत विचारले असता भाजप व काँग्रेस दोघांच्याही राज्यात अन्याय अत्याचाराचे प्रमाण सारखेच असल्याचे ते बोलले. बसपा ची यावेळी सुद्धा बहुजन समाजाला सोबत घेऊन एकला चलोरे ची भूमिका राहील असेही ते शेवटी म्हणाले.
पत्रपरिषदेला महाराष्ट्र प्रदेश बसपाचे स्थानिक प्रभारी व विदर्भाचे इन्चार्ज ऍड सुनील डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव नागपूर जिल्ह्याचे इन्चार्ज नागोराव जयकर, महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, नागपूर जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, नागपूर शहर उपाध्यक्ष उमेश मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.