बसपा ने आरक्षण दिवस साजरा केला 

[ez-toc]

नागपूर :-बहुजन राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजाची भागीदारी वाढवण्यासाठी 26 जुलै 1902 रोजी पुढारलेल्या चार जाती (ब्राह्मण, शेणवी, कायस्थ प्रभू, पारशी) वगळून इतर सर्व मागास जातींसाठी 50 टक्के आरक्षण लागू केले होते. कही हम भूल न जाये या बसपाच्या अभियानांतर्गत त्या घटनेची आठवण म्हणून आज बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने ने 26 जुलै हा आरक्षण दिवस म्हणून साजरा केला.

बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधान बनविण्याची संधी मिळाल्याने महात्मा फुलेंचे शैक्षणिक धोरण व शाहूंचे आरक्षण धोरण त्यांनी भारतीय संविधानात अंतर्भूत केले. परंतु आज देशभर सामाजिक, शैक्षणिक व नोकरी विषयक आरक्षणाच्या विरोधात आरक्षण विरोधी, अज्ञानी व जातीयवादी राजकीय लोकांकडून जाणून बुजून वादळ उठविल्या जात असल्याचे मत यावेळी बसपा नेत्यांनी व्यक्त केले.

मर्यादा नसलेल्या संविधानिक आरक्षणाच्या मर्यादेवर नेहमीच बोलल्या जाते. परंतु ज्या राजकीय आरक्षणाला दहा वर्षाची मर्यादा आहे हे अनुसूचित जाती-जमातींचे राजकीय आरक्षण मात्र न मागताही का वाढवून दिल्या जाते? यावर मागासवर्गीय समाजाने विचार मंथन करण्याची गरज असल्याचे मत याप्रसंगी बसपा नेत्यांद्वारे व्यक्त करण्यात आले. राज्य व केंद्र शासनाने अनुसूचित जाती, जमाती व ओबीसींचा बॅकलाग पूर्णता भरावा, असेही मत आरक्षण समारोहात व्यक्त करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश बसपाच्या नागपुरातील विभागीय कार्यालयात जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण दिन समारोह पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा सचिव अभिलेश वाहाने यांनी तर समारोप शहर प्रभारी सुमंत गणवीर यांनी केला.

याप्रसंगी जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा डोंगरे, माजी मनपा पक्षनेता जितेंद्र घोडेस्वार, माजी सभापती गौतम पाटील, आदिवासी नेते रोहित ईलपाची, शहर प्रभारी विकास नारायणे, माजी शहराध्यक्ष राजू चांदेकर, माजी नगरसेवक इब्राहिम टेलर, नरेंद्र वालदे, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, प्रा करूना मेश्राम, प्रा किरणकुमार पाली, जगदीश गजभिये, वर्षा वाघमारे आदींनी शाहूंच्या आरक्षण धोरणावर प्रकाश टाकला.

याप्रसंगी प्रामुख्याने शहर उपाध्यक्ष उमेश मेश्राम, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, प्रा सुनील कोचे, विद्यार्थी नेते अंकित थुल, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, प्रभारी शंकर थुल, उत्तर नागपूरचे प्रभारी योगेश लांजेवार, विलास मून, अनवर अंसारी, अनिल साहू, स्नेहल उके, बुद्धम राऊत, संभाजी लोखंडे, गौतम गेडाम, सुबोध साखरे, मनोज गजभिये, राजेश गवई, संगीत इंगळे, रामराव निकाळजे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गर्भवती माता व बालकांच्या नियमित लसीकरणाची नोंद आता ‘यू-विन’वर

Thu Jul 27 , 2023
– मोबाईलवरच मिळणार लसीकरणाची तारीख, केंद्रांची माहिती नागपूर :- आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत शहरातील सर्व नियमित लसीकरणाच्या नोंदी डिजिटल होणार आहेत. केंद्र शासनाद्वारे याकरिता ‘यू-विन’ पोर्टल सुरू करण्यात आले असून या पोर्टलवरच आता शहरातील गर्भवती माता आणि बालकांच्या नियमित लसीकरणाची नोंद केली जाईल. विशेष म्हणजे या पोर्टलच्या माध्यमातून लसीकरण झाल्यानंतर मोबाईलवर प्रमाणपत्र देखील डाउनलोड करता येईल तसेच लसीकरणाची पुढील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com