नागपूर :- लोकशाही गणराज्याचे चे जनक व मानवतावादाचे पुरस्कर्ते तथागत गौतम बुद्ध यांची जयंती बसपा नेते व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षाभूमीवर तथागतांना व बाबासाहेबांना पुष्प अर्पण करून, बुद्ध वंदना घेऊन साजरी करण्यात आली.
तथागत गौतम बुद्धाचा मानवतावादी प्रचार तत्कालीन सम्राट अशोक यांनी जगभर केला. सम्राट अशोकाचे युग हे स्वर्णयुग म्हणून संबोधले गेले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाच्या माध्यमातून सम्राट अशोकाचे युग हवे होते. बसपा ही बहुजन समाजाला संघटित करून संविधानाच्या माध्यमातून सम्राट अशोकाचे युग आणू इच्छिते असे मनोगत याप्रसंगी बसपा नेत्यांनी बुद्ध जयंती प्रसंगी दीक्षाभूमीवर व्यक्त केले.
याप्रसंगी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश बसपाच्या सचिव रंजना ढोरे, राजीव भांगे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी प्रा सुनील कोचे, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी, जिल्हा सचिव अभिलेश वहाने, जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख सुरेखा डोंगरे, सुनंदा नितनवरे, नागपूर शहर प्रभारी विकास नारायणे, माजी जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, उत्तर नागपूरचे अध्यक्ष जगदीश गजभिये, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, मध्य नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील, युवा नेते सदानंद जामगडे, माजी मनपा पक्षनेते गौतम पाटील, योगेश लांजेवार, नितीन वंजारी, प्रकाश फुले, महिपाल सांगोळे, मनोज निकाळजे, गौतम लोखंडे, एन आर उके, पतीतपावन नील, राजेंद्र सुखदेवे, भानुदास ढोरे, संजय डहाट, सुनंदा गाडगे, संबोधी डहाट, शंकर थुल, विलास मुन, रवी पाटील, श्रीकांत हाडके, वसंत नारायने, गजानन पाटील, सुनील सोनटक्के, संबोधी सांगोळे, अंशुल सोनटक्के, शामराव तिरपुडे, दिपीका डोंगरे, सिद्धार्थ सोनटक्के आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.