नागपुर – महापौर बनाओ अभियान अंतर्गत उद्या 20 नोव्हेंबर रोजी डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन उरुवेला कॉलनी येथे नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने दुपारी 11 वाजता कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नुकतेच महाराष्ट्र प्रदेश बसपाचे प्रभारी म्हणून नवनियुक्त झालेले धरमवीरसिंग अशोकजी पहिल्यांदा नागपुरात येऊन मार्गदर्शन करणार आहेत.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशचे दुसरे प्रभारी व राज्यसभा खासदार डॉक्टर अशोकजी सिद्धार्थ व प्रमोदजी रैना तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एडवोकेट संदीपजी ताजणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्र रामटेके, महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
कार्यक्रमाचे आयोजन नागपूर जिल्हा बसपाचे अध्यक्ष संदीप मेश्राम व शहराध्यक्ष इंजिनीयर राजीव भांगे यांनी केले असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन बसपाचे माजी प्रदेश कार्यालय सचिव उत्तम शेवडे यांनी केलेले आहे.