संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – नागपुर विभागीय आयुक्त कार्यालयात ओबीसी आरक्षणा विषयी जनतेचे मते ऐकुण घेण्याक रिता आलेल्या समर्पित आयोग समितीस बीआरएसपी प्रदेश अध्यक्ष विशेष फुटाणे यांच्या नेतुत्वात शिष्टमंड ळा भेटुन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकां मध्ये ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकां मध्ये ओबीसीं ना आरक्षण मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकार इंपेरिकल डाटा मिळवण्या साठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी समर्पित आयोग स्थापन करण्यात आला आहे. हा आयोग संपुर्ण महारा ष्ट्रात दोरा करून ओबीसी आरक्षणा विषयी जनतेची मागणी विषयी मत घेत आहे. शनिवार (दि.२८) मे हा समर्पित आयोग समिती नागपूर दौऱ्यावर असताना बी आरएसपी व्दारे ओबीसी आरक्षण बाबत समर्पित आयोगाला निवेदन देऊन राज्य शासनाने संपु्र्ण यथो चित पर्यंत करून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकां मध्ये ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी योग्य पर्यंत करण्यात यावे. यास्तव बीआरएसपी प्रदेश अध्यक्ष विशेष फुटाणे यांच्या नेतुत्वात शिष्टमंडळाने समर्पित आयोग समिती पदाधिका-याना भेटुन स्थानिक स्वरा ज्य संस्था निवडणुकां मध्ये ओबीसींना आरक्षण देण्या ची मागणी केली आहे. याप्रसंगी शिष्टमंडळात बीआर एसपी संयोजक डॉ जे बी रामटेके, प्रदेश महासचिव रमेश पाटील, शांताराम जळते, जिल्हा उपाध्यक्ष मोरध्वज अढाऊ, जिल्हा अध्यक्ष डॉ विनोद रंगारी, पश्चिम अध्यक्ष कमल किशोर, अशोक बागडे, प्रविण खापर्डे आदींचा समावेश होता.