निवडणूक गैरप्रकार ईव्हीएम व पैशाचा महापूर या विरोधात बीआरएसपी लढा उभारणार” – अँड.डॉ.सुरेश माने

नागपूर :-महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणूकीत अमाप पैशांचा महापूर, निवडणूकीतील लोकांचा स्वतंत्र व निःपक्ष निवडणूका यावरील विश्वास कमी होत असून निवडणूकामध्ये काळापैशांचा महापूर व निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरवापर यांना रोखण्यात भारतीय निवडणूक आयोग यंत्रणा संपूर्णपणे अपयशी ठरलेली असून या विरोधात राज्यघटना व लोकशाही रक्षणासाठी बीआरएसपी तर्फे राज्यात व दिल्लीत आगामी दिवसात पक्षातर्फे उग्र जन आंदोलन केले जाईल अशा प्रकारचा जाहीर ईशारा बीआरएसपीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड.डॉ. सुरेश माने यांनी नागपूर येथे दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी बीआरएसपी विदर्भ वतीने आयोजीत निवडणूक आढावा बैठकीत जाहीर केले आहे ही बैठक नागपूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन हॉन आवळे चौक, लष्करीबाग नागपूर येथे संपन्न झाली.

बीआरएसपी चा निवडणूकीतील सहभाग व अपयश याची समीक्षा करतांना अँड. डॉ. सुरेश माने यांनी असमाधान व्यक्त करून पक्ष संघटना यंत्रनेची पुनर्रचना करून आगामी निवडणूकांना सामोरे जाण्याचे सर्व बीआरएसपी पदाधिकारी-कार्यकर्ते यांना आवाहन केले याशिवाय निवडणूकीतील गैरप्रकाराचे विश्लेषण करताना राज्यात महाविकास आघाडीला फाजील आत्मविश्वास नडला तर लहान-लहान राजकीय पक्षांना या निवडणूकीत महायुती व महाविकास आघाडी या दोघांनी मिळून संपविण्याचे कटकारस्थान केले असाही आरोप अँड. डॉ. माने यांनी केला. या निवडणूकीत महायुती व महाविकास आघाडी नेत्यांकडून एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी करोडो रूपये काळापैशांचा वापर करण्यात आला तर या निवडणूकीतील काळापैशाचा गैरवापर रोखण्यास भारतीय निवडणूक आयोग कसा अपयशी ठरला याची चिरफाड करतांना राज्याच्या निवडणूकीत निवडणूक आयोग यंत्रणेतर्फे करोडो रूपये जप्त केले, करोडो रूपयाची दारू, सोने-चांदी जप्त केले त्याबाबतत निवडणूक आयोग व पोलीस यंत्रणेव्दारा राज्यात किती गुन्हे नोंदविले, कारवाई केली व हा काळा पैस कुणाचा होता, कुणासाठी वाटला गेला याचा विस्तृत खुलासा राज्यातील निवडणूक आयोग यंत्रणा व पोलीस यंत्रणा यांनी लोकहीतासाठी जाहीर करण्याचे आवाहन अँड.डॉ.सुरेश माने यांनी केले. देश व राज्यात भाजपा-मोदी कोंद्र सरकार व्दारा नोटबंदी नंतर काळा पैशाचा गैरवापर थांबेल या भाजपाच्या दाव्याची राज्य विधानसभा निवडणूकीतील पैशाच्या महापुराने पुरेपुर वस्त्रहरण केलेले आहे असे ही अँड. माने यांनी स्पष्ट केले.याशिवाय राज्यातील ईव्हीएम निवडणूक आकडेवारी, एकुण मताची टक्केवारी व महायुतीला मिळालेले अनपेक्षीत यश याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करून भारतीय निवडणूक आयोग आपल्या घटणात्मक जबाबदारीचे पालन करीत नसून त्याला केंद्र व राज्य सरकार यंत्रण्धा खतपाणी घालत असून याप्रकारे भारतीय लोकशाही व राज्यघटना या दोन्हीची हत्या केली जात असल्याचा आरोप अँड. माने यांनी अनेक उदाहरणासह केला. त्याचमुळे बीआरएसपी -मित्रपक्ष यांच्या तर्फे या सर्व बाबीचा विरोध करण्यासाठी राज्यात व दिल्लीत आणि दीर्घकाळ पक्षातर्फे आंदोलन केले जाईल. असे मानेनी घोषीत केले. याबैठकीला बीआरएसपीचे विदर्भातील सर्व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पक्षाची आवश्यकता लक्षात घेऊन व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूका लक्षात घेऊन पक्ष संघटनेत मोठे फेर बदल केले असून पक्षाचे नवीन पदाधिकारी लवकरच घोषीत करण्यात येतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आनंदाच्या भास आभासाचा उत्सव म्हणजे "शनिवार रविवार"

Sun Dec 1 , 2024
नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या नागपूर केंद्रात प्राथमिक फेरीत राष्ट्रभाषा परिवार सामाजिक सांस्कृतिक संस्था, नागपूर तर्फे ‘ शनिवार रविवार ‘ हे नाटक सादर झाले. माणूस नेहमीच आपल्या वाट्याला आलेली दुःखाची पोकळी भरून काढण्यासाठी वेगवेगळे खेळ खेळत असतो. मुळात खेळ हा प्रकारच गुंतवून घेणारा असतो. त्या खेळात आनंद शोधून विरंगुळा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com