शहरातील सर्व भाग सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये आणा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

नागपूर :- नागपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेले आहेत. यातील बंद व नादुरुस्त कॅमेरे पुन्हा संचालित करुन शहरातील रस्ते, गल्लोगल्ली तसेच सर्व भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आणा, असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नागपूर शहर तसेच जिल्ह्यातील विविध विषयांच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (ता.११) जिल्हा नियोजन भवन येथील सभागृहात आढावा बैठक घेतली. बैठकीत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा उपायुक्त विनोद जाधव यांच्यासह पोलिस, मनपा आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरांच्या स्थितीचा आढावा घेतला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी माहिती दिली. शहरात सुरक्षेच्या दृष्टीने एकूण ३६०० सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. यापैकी काहींमध्ये बिघाड आल्यामुळे बंदावस्थेत असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने शहरात निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरांची मोठी मदत होते. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरांची यंत्रणा अधिक अद्ययावत करण्याची गरज असून यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. नव्याने शहरातील सर्व भागात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येतील. जास्तीत जास्त भाग कव्हर व्हावा यादृष्टीने ठिकाण निवडण्यात यावेत. आवश्यकता भासल्यास खासगी जागेमध्ये देखील कॅमेरांचे खांब लावण्यात यावे. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असेही निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

शहरातील नादुरुस्त कॅमेरांच्या संदर्भात राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री यांना पत्र देण्यात येईल. यासोबतच ‘महाआयटी’च्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले. त्यांनी शहरातील नागरिकांच्या घरामधील सीसीटीव्हीची कनेक्टिव्हिटी पोलीस यंत्रणेकडे घेण्याबाबत पडताळणी करण्याची सूचनाही त्यांनी केली.

बैठकीमध्ये नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे ई-गव्हर्नन्स महाव्यवस्थापक डॉ. शील घुले यांनी विस्तृत माहिती सादर केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जातीय जनगणना व आरक्षण मर्यादा : दक्षा आणि दिशा

Sat Apr 12 , 2025
“आम्ही जातीनिहाय जनगणना करू आणि आरक्षणाची ५०% मर्यादा तोडू” काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अलिकडेच केलेले विधान चिंतेचा विषय आहे. यासोबतच, संघराज्य रचनेवर त्याचा काय परिणाम होईल याचाही विचार केला पाहिजे. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणांमध्ये वारंवार जातीय जनगणना करण्याची आणि आरक्षणावरील सध्याची ५०% मर्यादा तोडण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यांचा असा युक्तिवाद आहे की जोपर्यंत धोरणे तयार करणे प्रत्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!