– नेहरूनगर झोन अंतर्गत सक्करदरा १ आणि सक्करदरा २ जलकुंभाचा पाणीपुरवठा बाधित
नागपूर :- नेहरू नगर झोन अंतर्गत ४०० मी मी व्यासाची मुख्य जलवाहिनी व्यंकटेश सभागृह, सक्करदरा जलकुंभाजवळ क्षतिग्रस्त झाली आहे . नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर ह्यांनी ह्या जलवाहिनीला झालेल्या क्षती ला दुरुस्त करण्याचे काम तातडीने सुरु केले आहे. ह्या क्षतीमुळे नेहरू नगर झोन अंतर्गत – सक्करदरा १ आणि सक्करदरा २ जलकुंभाचा पाणीपुरवठा आज बुधवारी ( ४ ऑक्टोबर ) ला बाधित तर राहिलाच तसेच उद्या दिनांक ५ ऑक्टोबर (गुरुवारी ) रोजी जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत बाधित राहणार आहे.
नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर ह्यांनी ह्या जलवाहिनीला झालेल्या क्षती ला दुरुस्त करण्याचे काम तातडीने सुरु केले आहे आणि उद्या ऑक्टोबर ५ ला सकाळी ४ वाजेपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
ह्या आकस्मिक ब्रेकडाऊनमुळे पाणीपुरवठा बाधित झालेले आणि उद्या बाधित राहणारे भाग :
नेहरू नगर झोन : अयोध्या नगर , कैलास नगर, दुर्गा नगर , शिर्डी सिटी , जुना सुभेदार , बँक कॉलोनी, जम्मूदीप नगर, अंबिका नगर , श्रीराम वाडी आर एम एस कॉलोनी, इंदिरा गांधी नगर, गवळीपुरा, सेवादल नगर , राणी भोंसले नगर, भांडे प्लॉट, जवाहर नगर, , बँक कॉलोनी, चक्रधर नगर, लादीकर ले आउट , महालक्ष्मी नगर -१,२, आणि ३ व इतर भाग ..