संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- गरोदर मातेला सकस आहार मिळत बाळ सुदृढ जन्माला यावे यासाठी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून गरोदर मातेला सकस आहार पुरवठा केला जातो मात्र आजच्या आधुनिक युगातील बहुधा गरोदर माता ह्या सकस आहाराकडे पाठ फिरविलयाचे दिसून येत असल्याने सुदृढ समाजाची संकल्पना ही धोक्यात निर्माण झाली आहे परिणामी जन्माला आलेल्या बाळाला आईचे दूध हे कमी पडत असल्याने नाईलाजाने बाळाला दुधाच्या बाटलीने दूध पाजावे लागते .
‘आईचे दूध हे बाळासाठी अमृत’अशी म्हण आहे .त्याचप्रमाणे बाळासाठी सर्वात शुद्ध , उत्तम व अमुल्य अन्न हे दूध असते .बाळाचा जन्म झाल्यानंतर एका तासाच्या आत आईचे दूध देण्यास सुरुवात करणे गरजेचे असते.बाळाच्या जन्मानंतर पहिल्या तीन दिवसात स्तनपानातून घट्ट पिवळसर रंगाचे दूध येते त्याला कोलोस्ट्रम म्हणतात.काही मातांना हे दूध देणे गरजेचे नाही असे वाटते परंतु या दुधात महत्वाचे जीवनसत्व , अँटिबॉडीज व इतर घटक असतात जे बालकांच्या पोषणाला कारणीभूत असतात जे बालकांच्या पोषणाला कारणीभूत असतात तसेच हे घटक बाळाचे संसर्गजन्य आजारापासून रक्षण करतात दरम्यान काही हुशारर्जन्य मंडळी जन्मानंतर जन्मघुटी म्हणून मध, एरंडीचे तेल व इतर प्राण्यांचे दूध, साखर किंवा गुळाचे पाणी अथवा ग्राईपवॉटर पाजले जाते.परंतु याचा बाळाला उपयोग न होता त्रास होण्याची शक्यता असते .
आजच्या आधुनिक युगातील गरोदर माता ही खाजगी दवाखान्याच्या सल्ल्याकडे अधिक लक्ष पुरवून सरकारी रुग्णालयाकडे पाठ फिरवीत असते तसेच अंगणवाडी केंद्राकडून मिळणाऱ्या पोषक असा सकस आहाराकडेही दुर्लक्ष करीत असल्याने जन्माला येणारे बाळ हे पाहिजे तसे सुदृढ राहत नाही तसेच बाळ जन्मल्यानंतर स्वतःच्या फिटनेस ची काळजी घेण्याच्या उद्देशाने बाळाला स्वतःचे दूध पाजण्यापेक्षा दुधाच्या बाटलीने दूध पाजत असतात वास्तविकता बाळाला बाटलीने दूध पाजणे हे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे .बऱ्याचदा अस्वचछते मुळे उलट्या, जुलाब होऊन बाळाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.यामुळे समाजात स्तंनपाणाची जागा दुधाच्या बाटलीने घेतल्याने सुदृढ समाजासाठी धोक्याचे ठरत आहे तेव्हा गरोदर मातेने सकस आहाराचा पुरेपूर लाभ घेत बाळाच्या आरोग्याच्या हिताने बाटलीने बाळाला दूध पाजणे संदर्भात खबरदारी घेणे गरजेचे आहे.
-आईने बाळाला स्तनपान केल्यचे फायदे:-
आईचे दूध हे बाळासाठी सुरक्षित , स्वच्छ , जीवजन्तुविरहित व बाळाला आवश्यक त्या तापमानाचे असते व सहज पचते.
पहिल्या सहा महिन्यापर्यंत आईचे दूध हे बाळाचे संपूर्ण सात्विक अन्न होय.
पहोल्या काही आठवड्यात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यामूळे आईचे दूध बाळाच्या सुक्ष्मजीवजंतू पासून संरक्षण करते.आईचे दूध पाजल्याने बाळाला जटरासंबंधी किंवा पोटाचे विकार उदभवत नाहीत , बाळाचे जबडे व दात मजबूत होतात, बुद्धिमत्ता तल्लख होते , डोळ्यांची नजर तेज राहते व लठ्ठपणाची प्रवृत्ती कमी होते.