बोरडा टोल डिवाईडर ला ट्रक ची धडक, डिझेल टँक फुटुन आग लागुन सामानासह ट्रक खाक

कन्हान : – नागपुर जबलपुर चारपदरी नागपुर बॉयपा स महामार्गावरील बोरडा टोल नाक्याच्या डिवाईडर ला भरधाव वेगाने ट्रक ने धडक मारल्याने डिझेल टँक फुटुन लागलेल्या आगीत ट्रक सह सामानाची राख रांगोळी होऊन १२ लाखाचे नुकसान कुठलिही जिव हानी झाली नाही.
       गुरूवार (दि.२३) जुन ला सकाळी ५.५० वाजता दरम्यान ट्रक क्र.आर जे – ११- जी ८३१७ चा चालक हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ ने जबलपुर रोड कडुन आपला ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवि त आणुन त्याने टोल चे डिवायडरला धडक मारल्याने ट्रक च्या उजव्या बाजुला असलेले डिजल टँक फुटुन अचानक ट्रक मध्ये लाग लागली. ट्रक चालक त्यांचा कंडक्टर हे कसेतरी बाहेर निघाले. तेव्हा फायर ब्रिगेड ला फोन करून बोलावुन आग विझविण्यात आली.  ट्रक मध्ये पार्सल इलेक्ट्रीकल वस्तु व सामन होते. ते संपुर्ण ट्रक सहित जळुन खाक होत राख रांगोळी होऊ न अंदाजे १० लाख रूपयाचे नुकसान झाले. तर या  अपघात टोल नाक्याचे वेट मशीन व प्रोफायलर हे सुद्धा जळुन खाक झाल्याने अंदाजे २ लाख रूपयाचे नुकसान झाले. असे एकुण १२ लाखाचे नुकसान झाले आहे. अपघातात कोणालाही शारिरीक इजा झालेली नाही. अपघातास व नुकसान होण्यास ट्रक क्र आर जे – ११- जीबी – ८३१७ चा चालक हाच कारणी भुत असल्याने टोल नाक्यावर प्रत्यक्ष ड्युटीवर असले ले फिर्यादी राहुल प्रेमदास मनगटे वय २९ वर्ष राह. पिपरी-कन्हान मशिद जवळ यांचे तोंडी तक्रारी वरून कन्हान पोस्टे ला ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिवसेना के 37 'बागियों' ने डिप्टी स्पीकर को चिट्ठी

Fri Jun 24 , 2022
मुंबई – महाराष्ट्र में जारी सियासी संकट में बागी नेता एकनाथ शिंदे लगातार मजबूत और सीएम उद्धव ठाकरे कमजोर पड़ते नज़र आ  रहे हैं. गुरुवार को पूरे दिन चले सियासी उठापटक के बीच देर शाम असम के गुवाहाटी में डेरा डाले शिवसेना के 37 बागी विधायकों ने महाराष्ट्र विधानसभा के उपाध्यक्ष नरहरि जिरवाल को पत्र भेजा, जिसमें कहा गया कि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!