संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– गौवंश ७ बैलाना जिवनदान, पोलीसानी ६,४०,७०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला
कन्हान :- नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामा र्गावरील मातोश्री लॉन कांद्री जवळील राजु सरोदे च्या घरासामोर टिनाचे शेड मध्ये अवैद्यरित्या गौवंश जनावरे वाहतुक करणा-या महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन घुसुन टिनाच्या शेड मध्ये उभे असलेल्या दोन कार ला धडकल्याने घर मालकांचे नुकसान झाले. यात गैवंश बैलाना मार लागला असुन सकाळची वेळ असल्याने सुदैवाने जिवहानी झाली नाही. कन्हान पोलीसानी महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन चालक व मालका विरूध्द गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे.
बुधवार (दि.१५) मे ला सकाळी ६.४५ ला नागपुर जबलपुर चारपदरी महामार्गाने मनसर कडुन येणा-या गौवंशाचे ७ बैल कोबुन भरून महिंद्रा बोलेरो पिक अप वाहन क्र. एमएच ४० सीएम ४१९९ च्या चालका ने आपले वाहन वेगाने व निष्काळजीने चालविल्याने चालकाचे वाहनावरचे नियत्रंण सुटुन डावीकडे कांद्री येथील मातोश्री लॉन च्या जवळील राजु नामदेव सरोदे यांचे घराच्या टिनाच्या शेड मध्ये घुसुन पलटी होऊन तेथे उभी मारुती वैगनार कार क्र. एमएच ४० बी १ – २१२९ व मारूती ओमनी एमएच ४० एसी ४०१७ ला जोरदार धडक लागल्याने दोन्ही कार चे अदाजे एक लाख रूपयाचे नुकसान झाले. तर वाहन चालक व एक साथीदार घटनास्थळा वरून पसार झाले असुन पिकअप वाहनातील गौवंशाचे ७ बैलाना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले.
कन्हान पोलीसानी घटनास्थळी जप्ती पंचनामा कारवाई करून ०७ गोवंश जातीचे बैल प्रत्येकी किमत २०००० रु. प्रमाणे एकुण १,४०,००० रू., महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन किमत ५,००,००० रु. व एक जियो भारत कंपनीचा मोबाईल फोन किमत ७०० रु. असा एकुण ६,४०,७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन गौवंश ७ बैलांची चारा पाण्याची सोय व्हावी म्हणुन नागपुर येथील गौरक्षण मध्ये पाठवुन त्याच्या स्वाधिन करण्यात आले. कन्हान पोस्टे ला सरकार तर्फे फिर्यादी पो हवा. हरीष सोनभद्रे यांचे तक्रारीवरून महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क. एमएच ४० सीएम ४१९९ चा चालक व मालक यांचे विरुद्ध कलम २७९, ४२७ भादंवि., सहकलम ११ (१) (ड) प्राण्यांना कुरतेने वागणुक देणारा कायदा १९६०, सह कलम ५ (१ ), (२), ९ महाराष्ट्र प्राणी सुरक्षा अधि. १९९५ अन्वये गुन्हा दाखल करून पसार आरोपी चा कन्हान पोलीस शोध घेत आहे. सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सपोनि बावणकर, पोउपनि राठोड , पो हवा. हरीष सोनभद्रे, पो.ना. अमोल नागरे आदीनी पार पाडली.