संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 257 रक्तदात्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान
कामठी ता प्र 19 :- रक्तदान हे दानात दान असलेले सर्वश्रेष्ठ दान आहे .वाढत्या लोकसंख्येमुळे रुग्णांना रक्ताची कमी पडत असल्याने रक्तदान ही व्यापक चळवळ बनली असल्याचे मौलिक प्रतिपादन नागपूर शहर पोलीस विभागाचे एडिशनल सी पी नविनचंद्र रेड्डी यांनी व्यक्त केले.
हज़रत बाबा अब्दुल्ला शाह नौशाही क़ादरी र अ 149 सालाना उर्स व हज़रत सईद एजाज साहब कामठी वी च्या स्मरणार्थ आयोजित भव्य मेडिकल कैंप व रक्तदान शिबिरात ते बोलत होते. या मेडिकल कैंप चा 450 नागरिकांनी तपासणी केली तर 257 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
या प्रसंगी कामठी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष वैरागडे , पोलीस निरीक्षक राहुल शिरे, पोलिस उपनिरीक्षक आकाश माकने, माजी जी प अध्यक्ष कांग्रेस पदाधिकारी सुरेश भोयर, दरगाह कामेटी अध्यक्ष आबिद भाई ताजी, सचिव हाजी अनिस शेख ,सैय्यद निसार, राकिब अहमद, रमजान खान ,वसीम अजमेरी ,सैय्यद मेराज अली ,कामरान जाफरी ,नौशाद मसुरी ,साबीर ,शहबाज , दानिश , मोहसिन शेख ,राजा ,ईराशद पटेल, रिजवान , डॉ हसन रजा ,डां तौसीफ अली , डां चेतन, डां वासीम , तंजीम खुद्दामे नौशाही व असरा फाउंडेशन आदींची उपस्थिती होती.