– मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात
नागपूर :- बांधिलकी जोपासणारा रक्तदान शिबिराचा उपक्रम सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग व डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परिमंडळात तब्बल ११५ अधिकारी, कर्मचार्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहकार्य केले.
शिबिराचे उद्घाटन मुख्य अभियंता दिनेश नंदनवार यांनी केले. कार्यक्रमाला प्रादेशिक अधीक्षक अभियंते जनार्दन भानुसे, सुषमा बोंद्रे, नीता ठाकरे, कार्यकारी अभियंते अभिजित कुचेवार व चंद्रशेखर गिरी, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सचिव अशोक पत्की व डॉ. मदन काटे प्रामुख्याने उपस्थित होते.
मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. संचालन राजेन्द्र बारई यांनी केले. यावेळी सा.बां.विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटदारांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. कार्यक्रमासाठी उप अभियंता उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंते संदीप चाफले, ठाकूर, नागदिवे, राठोड, महल्ले यांच्यासह डॉ हेडगेवार रक्तपेढीच्या तंत्रज्ञांनी यांनी सहकार्य केले.