भंडारा :- आगामी लोकसभा विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरिता 1.1.2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छाया चित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्तपुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत घरोघरी जाऊन् बीएलओ मतदार पडताळणी करत आहेत.
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साकोली गौरव इंगोले, व सहाय्य्क मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार साकोली निलेश कदम यांनी याबाबत बीएलओची सभा घेतली.
बीएलओ प्रत्येक कुटुंबाला भेटी देवून मतदारांचे आधार नंबर, मोबाईल नंबरअद्यावत करणे. मतदार यादीतील नाव , फोटो, पत्ता दुरूस्तीकरीता अर्जदाराकडून नमुना 8 फार्म भरून घेणे दिव्यांग मतदारांचे अद्यावत यादी तयार करून दिव्यांग मतदारांचे नाव मतदार यादी मध्ये चिन्हां कित करणे करीता दिव्यांग मतदारांचे नमुना 8 फार्म भरून घेणे .तसेच VIP मतदार जसे आजी-माजीआमदार, खासदार, जि.प व पं.स, नगरपरीषदचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच व इतर सदस्य, बाजार समितीचे अध्यक्ष सदस्य व गावातील इतर प्रतिष्ठीत मतदारांचे नाव मतदार यादीत असल्याची खात्री करणे,चुकीने नाव डिलीट झाले असल्यास नमुना 6 भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे
बिएलओंना या प्रशिक्षणा मध्ये BLO APP डाऊनलोड करून ॲप मध्ये कसे काम करावयाचे आहे याचे सुध्दा प्रशिक्षण देण्यात आले. राजकीय पक्षाची देखील बैठक घेण्यात आली आहे.
तसेच 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत बिएलओ यांना घरोघरी भेटी देवून बिएलओ ॲपद्वारे मतदार यादीतील मय्य्त, दुबार, स्थलांतरीत मतदार वगळणे, दिव्यांग मतदार चिन्हांकित करणे, ब्लर फोटो गोळा करणे , नवीन मतदार नोंदणी, प्रतिष्ठीत व्यक्तींची तपासणी करून मतदार यादी अद्यावत करावयाची आहे. त्या करीता सर्व नागरिकांनी बिएलओ यांना सहकार्य करण्याचे आवाहन तहसिलदार साकोली निलेश कदम, यांनी कळविले आहे.