कोदामेंढी :- येथील वार्ड क्रमांक एक मधील भोजराज बावनकुळे ते केशव बावनकुळे यांच्या घरादरम्यानच्या सिमेंट रस्त्याचे काम मागील तीन महिन्यापूर्वी पासून रस्ता खोदून तेथे काळ्या गिट्टीचे बोल्डर टाकून ठेवले आहे. मात्र दिवाळीला सुरुवात होऊनही काम पूर्ण न झाल्याने रस्त्यावर गिट्टीचे बोल्डर तसेच राहिल्याने नागरिक कमालीचे त्रस्त असून, महिलांना घरासमोरील अंगणात रंगोळी टाकता न येत नसल्याने त्याही कमालीच्या त्रस्त आहेत.
दिवाळीनिमित्त भाऊबीजेला येणारे पाहुणे मंडळीचे बालगोपाल रस्त्यावर काळ्या बोल्डर पसरले असल्यामुळे इतर खेळ खेळता येत नसल्याने, रस्त्यावर पसरलेल्या गिट्टीच्या खेळ खेळून एकमेकांचे डोके फोडत असल्याचे तेथील नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. रस्त्याच्या कंत्राट घेणाऱ्या त्या ठेकेदाराच्या मागे संबंधित अधिकारी व संबंधित प्रशासन विभागाने फटाके लावून काम सुरू करण्यास लावावे अन्यथा त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून ते काम नवीन ठेकेदाराला देण्यात यावे अशी मागणी वार्ड क्रमांक एक चे सामाजिक कार्यकर्ते चंदू कारेमोरे सह त्या रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या त्रस्त नागरिकांनी, महिला व बालगोपालांनी केली आहे.