बीकेसीपी शाळेच्या खेडाळुंची मैदानी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर च्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय ऍथलेटिक्स स्पर्धेत बीकेसीपी शाळा कन्हान पारशिवनी तालुक्या तील खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी केली.

दि.१७ ते १९ या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्यामार्फत विभागीय मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळात बीकेसी पी शाळा कन्हान च्या काही गुणवंत खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्णपदक पटकावले व राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे. या स्पर्धेत शाळेची गुणवंत खेळाडु अनन्या मंगर हिने ४०० मीटर व धावनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्ण पदक पटकावले व राज्यस्तरीय स्पर्धेत आपले नाव नोंदवले आहे. अनन्यासह, गौरव सिंग, प्रथमेश बारई, सोहम ठाकरे, सनी कारेमोरे या खेळाडुंनी ४ x १०० रिले धावनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्ण पदक प्राप्त करून राज्य स्पर्धेत आपल्या चंमुचा प्रवेश निश्चित केला आहे. हे सर्व खेळाडु बीकेसीपी शाळेच्या शारीरिक शिक्षक अमित राजेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्श नात प्रशिक्षण घेत आहेत. बीकेसीपी शाळेचे संस्था अध्यक्ष श्री राजीव खंडेलवाल सर, सचिव पुष्पा गेरोला , हायस्कुलच्या मुख्याध्यापिका कविता नाथ, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रुमाना तुर्क, ज्येष्ठ शिक्षक विनयकुमार वैद्य, सर्व अधिकारी, शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंदानी विजेत्या खेळाडुंचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील राज्य स्तरिय स्पर्धेच्या यशा करिता शुभेच्छा दिल्या आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मध्यरात्री दिल्लीत महायुती बैठक; अमित शाहसमोर जागावाटपाचा तिढा सुटला?

Sat Oct 19 , 2024
– महायुतीची काल रात्री महत्वाची बैठक पार पडली. मध्यरात्री महायुतीची बैठक झाली. अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बैठकीत होते. वाचा सविस्तर... नवी दिल्ली :- विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. अशात महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. त्यासाठी काल मध्यरात्री महायुतीची बैठक पार पडली. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com