बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपा महाराष्ट्रात आगेकूच करेल : ॲड.मेश्राम

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती ही पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. बावनकुळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात उत्तमरित्या आगेकूच करीत राहिल, असा विश्वास भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीबद्दल ॲड. मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले व पक्षश्रेष्ठींचे आभार मानले.

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील  चंद्रशेखर बावनकुळे यांना विदर्भातील ओबीसी समाजाचे नेते म्हणून समाज मान्यता आहे. त्यांच्या नेमणुकीने राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रुपाने विदर्भातील नेतृत्वात जो विश्वास दाखविला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री  अमित शाह, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वमान्य लोकनेते  देवेंद्र  फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयासाठी सर्वांचे धन्यवाद.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात उत्तमरित्या आगेकूच करित राहिल, असा विश्वास ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

हिंदी विश्‍वविद्यालयात विभाजन विभीषिका स्‍मृती प्रदर्शनाचे उद्घाटन

Sat Aug 13 , 2022
विभाजनाचे दु:ख आम्‍हाला अखंड भारताचे मूल्‍य समजावते : उपमुख्‍यमंत्री  देवेंद्र फडणवीस वर्धा : विभाजनाचे दु:ख आम्‍हाला अखंड भारताचे मूल्‍य समजावते असे प्रतिपादन महाराष्‍ट्राचे उपमुख्‍यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात विभाजन विभीषिका स्‍मृतीनिमित्‍त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. उपमुख्‍यमंत्री  फडणवीस यांनी शुक्रवार, 12 ऑगस्‍ट रोजी विभाजन विभीषिका स्‍मृती प्रदर्शनाचे उदघाटन केले त्‍यानंतर त्‍यांनी कस्‍तूरबा सभागृहात उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाच्‍या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!