भाजपाचे 12 जानेवारीला शिर्डीत प्रदेश अधिवेशन – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

– अमित शाह, नड्डा यांची उपस्थिती

– मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार       

मुंबई :- भारतीय जनता पार्टीचे शिर्डी (जि. अहिल्यानगर) येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी, 12 जानेवारी 2025 रोजी प्रदेश अधिवेशन होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत.

12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. याचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश भाजपाने एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित हे अधिवेशन असेल. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनुसार युवकांना प्रेरित करून भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी या वेळी नवीन अभियानाची सुरुवात होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या अधिवेशनात भव्य सत्कार केला जाणार आहे.

10 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार

शिर्डी येथील अधिवेशनासाठी राज्यभरातून सुमारे 10 हजार भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी म्हटले आहे. तरुणाईशी संपर्क वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याने हे अधिवेशन भाजपाच्या आगामी काळातील योजनांसाठी महत्त्वाचे असेल, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

14 डिसेंबर पासून नवी मुंबई वाशीत “महालक्ष्मी सरस -2024” चे आयोजन

Fri Dec 13 , 2024
नवी मुंबई :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने  नवी मुंबईत वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर या ठिकाणी दि. १४ ते २५ डिसेंबर, २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय “महालक्ष्मी सरस प्रदर्शन-2024” चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येत आहे. अशी माहिती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, यांनी दिली आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून संघटित करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!