नागपूर :- आज भारतीय जनता युवा मोर्चा, नागपुर महानगरातर्फे जितेंद्र अव्हाडांचा पुतळा सुभाष पुतळा चौक येथे फुंकण्यात आला. जितेंद्र अव्हाड पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असतांना ‘अफजल खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना! असं वक्तव्य जितेंद्र अव्हाड यांनी केलंय. हे अतिशय निंदनीय आहे. जितेंद्र अव्हाड, भविष्यात किंव्हा आज ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीही बोलणार असाल तर ते सहन केलं जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राची अस्मिता आहेत आणि जितेंद्र आव्हाड सारखी औरंगझेब आणि शायीस्तेखानाची पिलावळ जर महाराजांचा असा अपमान करणार असेल तर भाजपा हे मुळीच खपवून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज हा महाराष्ट्र आहे लक्षात हे जितेंद्र अव्हाडांनी लक्षात ठेवावे. जितेंद्र आव्हाड जाणीवपूर्वक वारंवार ठरवून करीत आहेत हे महाराष्ट्राला कळून चुकले आहे आणि आता ते शिवप्रेमींच्या भावनांचा अंत पाहत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी या विषयात त्वरित माफी मागावी.
आव्हाडांनी जर अशी नालायकपणाची वक्तव्य त्वरित थांबवली नाहीत तर औरंगझेबाच्या या पिलावळीला भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्रात फिरू देणार नाही असेही यावेळी भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे यांनी ठणकाऊन सांगितले.
आंदोलनाला प्रमुख्याने भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, मंडळ अध्यक्ष सन्नी राऊत, घनश्याम ढाले, वेदांत जोशी, आशिष मेहेर, गोविंदा काटेकर, विकी बगेल, सौरभ पाराशर, गुडू पांडे, इजाज शेख, तुषार ठाकरे, दिनू साहू, मयूर तपासे, अन्नू यादव, मनीष धार्मिक, प्रशांत बघेल, शुभम पठाडे, ऋतिक कापसे, सोनू माणिकपुरी, अनुज गोरे, व सौरभ फरांदे उपस्थित होते.