– जनतेचे प्रेम हीच खरी ताकद
यवतमाळ :- भाजपा महायुती सरकारने नानाविध योजनेचे अनुदान, सानुग्रह निधी लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा केले. काँगेसच्या काळात केंद्राने एक रुपया पाठविला तर लाभार्थ्याला 15 पैसै मिळायचे असे दिवंगत राजीव गांधी यांनी कबूल केले होते, मात्र भाजपा महायुतीच्या काळात योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळू लागला आहे. त्यामुळे विकासाचे चक्र गतिमान झाले आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार मदन येरावार यांनी बेचखेडा येथील प्रचार सभेत केले. त्यावेळी मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला.
भाजपा महायुतीने विकासाला चालना देण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. सामाजिक उत्थानासाठी नानाविध योजना सूरू केल्या आहेत. लेक लाडकी योजनेमुळे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना आधार मिळाला आहे. मुलीच्या जन्मापासून लग्नापर्यंत सरकार वेळोवेळी आर्थिक मदत उपलब्ध करून देत आहे. पालकांना आता मुलींच्या उच्च शिक्षणाची काळजी करावयाची गरज राहिलेली नाही. मोफत उच्च शिक्षण झाल्याने सर्वसामान्य गोरगरीब पालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. महिलांना एस टी बसचा प्रवास निम्मं सवलातीच्या दरात सुरू कऱण्यात आला. त्यात लाडकी बहीण योजनेमुळे सामान्य कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये कऱण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांसाठी महायुती सरकारने 1 रुपयात पिकविमा योजना सूरू केली. यापूर्वी सततच्या पावसामुळे नुकसान भरपाई मिळत नव्हती. मात्र आता अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान देखील नुकसान भरपाईच्या कक्षेत घेतले आहे. 8 हजार कोटी रुपयांचा विमा शेतकऱ्यांना देण्यात आला. शेतकरी सन्मान योजनेचा निधी वाढविण्यात येणार आहे. यवतमाळ मतदारसंघात 40 कोटींचे पाणंद रस्ते बांधण्यात आले आहेत. राज्यात 45 हजार किमीचे पाणंद रस्ते बांधण्यात येतील. पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. मागेल त्याला शेततळे योजनेमुळे शेतकरी बांधवांना मोठा फायदा झाला आहे. पाण्याची पातळी वाढली आहे.
पुर्वी कुठल्याही योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळत नव्हता. दिवंगत राजीव गांधी यांनी लाभार्थ्यांना एका रुपयातील फक्त 15 पैसेच पोहचत असल्याचे कबूल केले होते. मात्र मोदीनी डीबिटी सूरू केली. अनुदानाचे पैसै थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे विकासाचे चक्र गतिमान झाले आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार मदन येरावार यांनी बेचखेडा येथील प्रचार सभेत केले. यावेळी प्रचार सभेला भाजपा तालुका प्रमुख चिंतामण पायघन, बाळासाहेब शिंदे, दयाल आडे, यु डी आग्रे, अजय धुरट, श्याम जयस्वाल, जितेंद्र विरदंडे आदी उपस्थीत होते.