अरोली :- खात – रेवराल जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या घोटमुंढरी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणावर आज 12 जानेवारी रविवारला महाराष्ट्र ग्रामपंचायत मौदा तालुका कर्मचारी युनियन 45 11 च्या वतीने राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या फोटोला माल्यार्पण ,पूजाअर्चना व त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी मौदा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियन अध्यक्ष , घोटमुंढरी ग्रामपंचायत चे कर्मचारी परमवीर गजभिये, नागपूर जिल्हा सचिव, खंडाळा (गांगनेर )येथील ग्रामपंचायत कर्मचारी सतीश वाघमारे, तालुका उपाध्यक्ष , वीरसी येथील ग्रामपंचायत कर्मचारी आशिष वैद्य, सदस्य गण अरुण कुठे, दिपाली तांबडे, परमेश्वर ऊके, अभिजीत वानखेडे, समीर रामटेके ,अरोली, कोदामेंढी, भांडेवाडी या गावांच्या नावाने वृत्तपत्र व जाहिरात एजन्सी असलेले व मौदा तालुक्यात ज्या गावात वृत्तपत्र जात नाही अशा सर्व गावा गावात जाऊन स्वतः सर्वच, वाचकाला पाहिजे ते वृत्तपत्र चे वाटप करणारे कोदामेंढी येथील नागपूर वरून प्रसारित होणाऱ्या विविध हिंदी व मराठी दैनिकाचे वृत्तपत्र, जाहिरात एजंटसह या विविध दैनिकाचे वार्ताहर व न्यूज टुडे ट्वेंटी फोर बाय सेव्हन या ई पोर्टलचे ऑल इंडिया न्यूज रिपोर्टर किशोर कांताबाई मदन साहू सह मौदा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे सर्व कर्मचारीगण उपस्थित होते.