कोदामेंढी :- दिनांक ०२/१०/२०२४ बुधवारलां ग्रामपंचायत कार्यालय येसंबा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली . त्यांच्या फोटोवर मार्ल्यापण टाकून, पूजा अर्चना करून, त्यांच्या जीवनावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच धनराज हारोडे ,पोलिस पाटील नरेंद्र राऊत,सचिव विनोद तागडे , अंगणवाडी सेविका माया चकोले ,आशावर्कर सुषमा गजभिये , मदतनीस कांता गजभिये, पुरुषो्तम मेश्राम, नरेश डडूरे, सोहन हारोडे, कुमार गढे व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संजय गजभिये व बालगोपाल उपस्थित होते.