कोंढाळी :- रानडुकराने धडक दिल्या नंतर दुचाकीला झालेल्या अपघातात मोहन गोविंदराव लक्षणे (२२) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळी (काळबांडे) येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मृतक मोहन गोविंदराव लक्षणे (वय २२, देवळी काळबांडे) हा एमएच ४०, सीव्ही ९८०९ क्रमाकांच्या हीरो स्प्लेंडरने खासगी कंपनीत कामावर जात असताना वलनी नाल्याजवळ रान डुकरांचा कळपाने त्याला धडक दिली. त्यातच खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला.
घटनेची माहिती मिळताच कोंढाळीचे ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांनी ऑन डिवटी पोलीस उपनिरीक्षक शेख सलीम व शिपाई अच्युत गुट्टे यांनी घटनास्थळी धाव घेतली, गवकर्यांनी जखमी लक्षणेला अडेगाव प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले होते . तिथे डाॅक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. पोलीस उपनिरीक्षक शेख सलीम यांनी घटनास्थळ पंचनामा केल्यावर मृतकाचे शव विच्छेदनास शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.