संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोटर स्टँड चौकात स्थित बिकानेरी हॉटेल व्यवसायिकाने एका महिलेची नगदी रोख व आवश्यक दस्तावेज ने भरले असलेली हरवलेली बॅग त्या महिलेला परत करून माणुसकीचा परिचय दिल्याची घटना काल निदर्शनास आली असून माणुसकीचा परिचय देणाऱ्या या हॉटेल व्यवसायिकाचे नाव राधेश्याम खत्री असे आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर महिला ही कामठी कॅन्टोन्मेंट च्या रुग्णालयात वार्ड सेविका म्हणून कार्यरत असून एका अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी 21 मे ला गोंदिया ला जात असता जाण्यापूर्वी भूक लागल्याने मोटर स्टँड चौकातील बिकानेरी हॉटेल येथे दुपारी 3 वाजता नाशता करून घाई घाईत ट्रॅव्हल्स ने निघून गेली मात्र या घाई गडबडीत सदर महिला पाच हजार रुपये ने भरलेली बॅग हॉटेल मध्येच विसरली.ही बाब हॉटेल मालक राधेश्याम खत्री यांच्या लक्षात येताच बॅग मध्ये असलेली सदर महिलेची सॅलरी स्लिप वरून शोध लावण्याचा प्रयत्न करीत माजी उपाध्यक्ष दिनेश स्वामी पिल्ले व मोन्टू भुटानी यांच्या माध्यमातून त्या महिलेचा शोध लावण्यात यश गाठले .महिलेचे नाव रज्जू प्रकाश कावळे असे आहे तेव्हा पाच हजार रुपये व आवश्यक दस्तावेज ने भरलेली बॅग त्या महिलेला परत करून राधेश्याम खत्री यांनी समाधान व्यक्त केले तर हरवलेली बॅग परत मिळाल्याने रज्जू कावळे यांनी आभार व्यक्त केले.