नागपूर :- अकोला जिल्ह्यातील अकोट हिवरखेड तेलारा या रस्त्याचे काम विष्णू मोहंती यांनी पूर्ण केले. सदर रस्त्याचे काम सुधीर कंट्रक्शन या कंपनीला मिळाले होते. विष्णूचरण मोहंती यांना सब कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. त्यांनी संपूर्ण अटी नियमाचे पालन करून पूर्ण केला. त्या कामाची मोजणी, स्थळ, निरीक्षण, पंचनामा, अशा सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर कामाचे देयक दोन वर्षांपूर्वी टाकले होते आणि ते मंजूर सुद्धा झाले होते. परंतु अद्यापही त्या कामाचे बिल मिळाले नाही.
रस्त्यांचे काम पूर्ण करण्याकरिता आम्ही नातेवाईकांन कडून, खाजगी मित्र, सावकार, यांच्याकडून पैसे घेतलेत. गेल्या दोन वर्षापासून होणाऱ्या त्रासामुळे आमच्या मुलांवर उपासमारीची वेळ आली. सुधीर कंट्रक्शनच्या ऑफिसमध्ये व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार चकरा मारून थकलो. तरीसुद्धा थकबाकी मिळाली नाही. या प्रकरणा संदर्भात समाजात, आधीच आमची अब्रू गेली आहे. 4 करोड 23 लाख रुपयाची थकबाकी आहेत. ते आम्हाला ताबडतोब मिळण्यात यावी अशी आमची मागणी पत्र परिषदेत केली आहे.
येत्या 20 मे ला विष्णू मोहंती यांना न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करणार असल्याची माहिती सुद्धा दिली. आम्हा परिवारांना न्याय मिळावा. याकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यासमोर अर्धनग्न अवस्थेत उपोषणाला बसणार असल्याची माहिती नागपूरातील उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात पत्रकारांना दिली. या प्रकरणी संदर्भात सर्वस्वी जबाबदार सुधीर कंट्रक्शन चे संचालक शिशिर खंडार व शरद खंडार दोघीही राहणार समशिष भवन, मुळीक कॉम्प्लेक्स, होटेल एअरपोर्ट सेंटर पॉइंट वर्धा रोड, सोमलवाडा नागपूर हे असतील.अशी माहिती पत्रपरिषदेत बिजया मोंहतीनी सांगितले.