आधार बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय..आता 10 वर्षांत हे काम करावेच लागेल..

नवी दिल्ली :- केंद्र सरकारने आधार कार्डबाबत नवीन निर्णय घेतला आहे. त्यासाठी आधारच्या नियमांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. याविषयीची अधिसूचनाही केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आधार कार्ड अपडेट करण्याविषयीचा नियम लागू झाला आहे. त्याअंतर्गत आता आधार कार्डधारकांना या गोष्टी करणे आवश्यक आहे.

आधार नोंदणी आणि अपडेट नियमा अंतर्गत 2022 ही 10वी दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे आधार कार्डधारकांना दर 10 वर्षांनी आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. त्यासाठी कागदपत्रे सादर करावे लागतील.

आधार कार्डला 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कार्डधारकाला त्याचे ओळखपत्र, रहिवाशी प्रमाणपत्राआधारे आधार अद्ययावत करता येईल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ( UIDAI) आधार कार्डला 10 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी ते अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे.

आधार कार्ड सुरु झाल्यापासून त्यात बदल होत गेले. बनावट आधार कार्डला आळा घालण्यासाठी अनेक सुरक्षात्मक घटक समाविष्ट करण्यात आले. तरीही अनेकांचे बोगस कार्ड तयार होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या नवीन नियमांमुळे बोगस आधार कार्ड ओळखण्यास मोठी मदत होणार आहे. आधार कार्डाचा चुकीचा वापर थांबविता येणार आहे. तसेच आधार कार्ड तयार करताना काही चुका राहिल्यास त्यात नागरिकांना दुरुस्ती करता येणार आहे.

आधार कार्ड अपडेट करणे आणि त्याविषयीच्या शुल्काची प्राधिकरणाने संपूर्ण माहिती दिली आहे. My Aadhaar Portal-https://myaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर नागरिकांना ही सुविधा मिळेल. जवळच्या आधार केंद्रावर ही सुविधा मिळेल.

जर एखाद्या व्यक्तीने आधार कार्ड अद्ययावत केले नाही. यापूर्वी त्यांनी आधार कार्ड तयार करताना योग्य ती कागदपत्रे सादर केली नसतील तर त्यांचा आधार क्रमांक नामंजूर होऊ शकतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पेाद्दार इंटरनॅश्नल स्कुलच्या विद्यार्थ्यांची म.न.पा.च्या बाजीराव साखरे ई- ग्रंथालयास भेट

Thu Nov 10 , 2022
नागपूर :-  आज दि. 11.11.2022 रोजी पोदार इंटरनॅश्नल स्कुल, गोधनी, नागपूर येथिल 175 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षकानी नागपूर महानगरपालिका संचालित, बाजीराव साखरे ई- ग्रंथालय, आवळेबाबू चौक, लष्करीबाग येथे भेट दिली. नागपूर महानगरपालीका संचालीत, सार्वजनिक ग्रंथालय व अध्ययन कक्ष लहान मुलांकरीता, विद्यार्थीकरीता, नागरींकांकरीता कशी उपयुक्त ठरत आहे, याबाबत माहिती देण्यात आली. या प्रसंगी पुस्तके वाचनाचे महत्व विषद करण्यात आले तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com