वैदर्भीय रंगभूमीचे भूषण गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमी पोरकी ! 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना

मुंबई, दि. 30 : वैदर्भीय रंगभूमीचे भूषण असलेले ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमी पोरकी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायडू यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, गणेश नायडू हे मराठी रंगभूमीवरील एक मोठे नाव होते. विविध कलागुण संपन्न असलेले नायडू यांनी ख्यातनाम प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार आणि नट, दिग्दर्शक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. विदर्भात हौशी रंगभूमीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आपण कधीही विसरू शकत नाही. रंजन कला मंदिर नावारुपाला आणण्यातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. राज्य शासनाच्या विविध नाट्य स्पर्धांमध्ये तसेच इतर व्यासपीठांवर त्यांच्या नाटकांना रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असे. हौशी नाट्य कलाकारांना आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्न करत असत.

त्यांच्या निधनाने वैदर्भीय रंगभूमीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. आयुष्यभर अतिशय निष्ठेने नाट्यकलेची त्यांनी सेवा केली. त्यांचे कुटुंब, मित्र परिवार यांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुलाबा सिप्झ मेट्रो लाईन-३ ची यशस्वी चाचणी.

Tue Aug 30 , 2022
मेट्रो ३ प्रकल्प पर्यावरण पूरक ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 30 :“ राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने जीवन वाहिनी ठरणारा मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा ठरेल,” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्यावतीने कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडोर (एक्वा लाईन) मुंबई मेट्रो ३ च्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com