रामटेक :- नविन आर्थिक वर्षात तालुक्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायतींमध्ये विविध विकासकामे सुरु आहेत. अशाच प्रकारची विकासकामे तालुक्यातील आर्थिक दृष्टीकोनातुन सधन मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत नगरधन येथे होत असुन तब्बल १९ विकासकामांचे भुमीपुजन नुकतेच येथे सरपंच माया दमाहे, उपसरपंच राम धोपटे तथा सदस्यांच्या हस्ते करण्यात आले.
तालुक्यात आर्थिक दृष्टीकोनातुन बोटावर मोजण्याएवढ्या ग्रामपंचायती सधन आहे. त्यातीलच एक ग्रामपंचायत नगरधन आहे. येथे नुकतिच निवडणुक झाली व नवनियुक्त बॉडी बसली. येथे नुकतेच दि. २५ जुलै ला १२ वाजता दरम्यान नाली तथा रस्ता बांधकामाच्या तब्बल १९ विकासकामांचे सरपंच माया दमाहे, उपसरपंच राम धोपटे तथा सदस्यांचे हस्ते भुमीपुजन झाले. नागरी सुविधा व दलीत वस्ती योजनेंतर्गत ही कामे होत असल्याचे सरपंच माया दमाहे व उपसरपंच राम धोपटे यांनी माहीती देतांना सांगीतले. भुमीपुजनवेळी उपस्थितांमध्ये सरपंच माया दमाहे, उपसरपंच राम धोपटे, ग्रामविकास अधिकारी प्रतिभा गिरी, सदस्य शरद राठीपिटने, सुरेखा नागरीकर, सचिन दशहरे, मिनाक्षी वाघमारे, माधुरी बोरकर, विलास कुंभले, रोशनी वासनिक, शारदा सरोदे, चंद्रकांत नंदनवार, संगीता तरारे, जितेंद्र सरोदे, मोहीत इखार, शारदा ठाकरे, वासुदेव चवरे, रोशनी सरोदे, संगीता नान्हे यांचेसह ग्रा.पं. कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.