राष्ट्रपतींच्या हस्ते भूमी सन्मान 2023 प्रदान

नवी दिल्ली :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत, ‘भूमी सन्मान 2023’ प्रदान करण्यात आले.केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. सरकारच्या डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम(DILRMP) अंतर्गत, भूमी नोंदणीचे काम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या चमूसोबत, संबंधित राज्यांचे सचिव आणि जिल्हयाधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, ग्रामीण विकासाला गती देणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केले. ग्रामीण भागांच्या विकासासाठी, भूमी दस्तऐवजांचे आधुनिकीकरण करणे ही मूलभूत आवश्यकता आहे, कारण, ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक, उपजीविकेसाठी, भू संसाधनांवर अवलंबून असतात, असे त्या म्हणाल्या. ग्रामीण भागांच्या सर्वसमावेशक विकासासाठी एक व्यापक आणि एकात्मिक भूमी व्यवस्थापन प्रणाली अत्यंत महत्वाची ठरते, असे त्यांनी सांगितले.

डिजिटलीकरणामुळे पारदर्शकता वाढते. भूमी दस्तऐवजांचे डिजिटलीकरण आणि आधुनिकीकरण, यांचा देशाच्या विकासावरही मोठा परिणाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भूमी दस्तऐवजांचे डिजिटलीकरण करणे आणि त्यांना सरकारच्या विविध विभागांशी ऑनलाईन जोडणे, यामुळे, सर्वच विभागांना त्यांच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक योग्य प्रकारे करता येईल. तसेच, कधी, पूर किंवा आग लागणे अशा नैसर्गिक किंवा इतर आपत्तिकाळात कागदपत्रांचे नुकसान झाले किंवा ती गहाळ झाली, तर डिजिटल स्वरूपात ती उपलब्ध असतील, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

डिजिटल इंडिया भूमी माहिती व्यवस्थापन प्रणालीअंतर्गत, एक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन क्रमांक देखील दिला जातो, जो आधार कार्डप्रमाणे उपयुक्त ठरतो, ही अतिशय समाधानकारक गोष्ट असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. हा क्रमांक, जमिनीचा योग्य वापर करण्यास तसेच, नव्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी देखील वापरला जाऊ शकेल, असे राष्ट्रपती म्हणाल्या. ई-न्यायालयांशी, भूमी दस्तऐवज जोडणे आणि आणि त्याच्या डेटा बेसची नोंदणी याचेही अनेक फायदे आहेत, असे त्या म्हणाल्या. डिजिटलीकरणामुळे येणारी पारदर्शकता, जमिनीशी संबंधित सर्व अवैध आणि अनैतिक व्यवहारांना आळा घालणारी ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

जमिनीशी संबंधित माहिती मुक्त आणि सहजपणे उपलब्ध झाल्यामुळे देखील, अनेक लाभ होऊ शकतील. डिजिटलीकरण आणि माहिती एकमेकांशी जोडल्यामुळे, लोकांचा आणि संस्थांचाही वेळ तसेच ऊर्जा वाचेल, जी इतर विकासकामांमध्ये वापरता येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

24व्या कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ भारतीय सैन्याद्वारे नवी दिल्ली ते द्रास दरम्यान तिन्ही दलातील सर्व महिलांच्या मोटरसायकल रॅलीचे आयोजन

Tue Jul 18 , 2023
नवी दिल्ली :- 1999 च्या कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवून 24 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ आणि महिलांची अदम्य भावना अधोरेखित करण्यासाठी भारतीय सैन्याने तिन्ही दलातील सर्व महिलांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक, दिल्ली ते कारगिल युद्ध स्मारक, द्रास (लडाख) दरम्यान नारी सशक्तिकरण महिला मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले. 18 जुलै 23 रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारक, नवी दिल्ली येथून महिलांच्या मोटरसायकल रॅलीला लष्करप्रमुख जनरल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!