संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 14:-कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी च्या काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाईसमस्या ही दैनंदिन झाली असून ‘घरी नळ तरी पाण्याचा रड’अशी स्थिती होती .यासंदर्भात पाणी समस्येचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी तरुण समाजसेवक आकाश प्रदीप भोकरे यांनी पुढाकार घेत 15 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत आज कुंभारे कॉलोनीत चार बोरवेल उभारणी साठी विधिवत भूमीपूजन करण्यात आले. यावेळीसमस्या मार्गी लागत असल्याचे समाधान व्यक्त करीत प्रयत्नशील असलेले आकाश भोकरे यांचे आभार मानले.
हे भूमिपूजन कुंभारे कॉलोनी रहिवासी निक्की बाजी व आकाश भोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी माजी नगरसेविका सावला सिंगाडे,माजी नगरसेवक नीरज लोणारे, उदास बन्सोड यासह मोठ्या संख्येत नागरिक गण उपस्थित होते.
कुंभारे कॉलोनीत चार बोरवेल उभारणीचे भूमीपूजन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com