संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- काल भारत श्रीलंका क्रिकेट मॅच पाहत असता भारत कडुन खेळत असलेले क्रिकेटर विराट कोहली ने छक्का मारताच आनंदाच्या मोहात टीव्ही वर मॅच पाहत असलेल्या महिलेला इतकी खुशी झाली की त्यांना हसता हसता अचानक हृदय विकाराचा झटका झाला व जागीच मृत्यू झाला ज्यामुळे या महिलेला क्रिकेट मॅच पाहणे चांगलेच भोवले असून मृतक महिलेचे नाव उषा गजभिये वय 50 वर्षे रा खैरी ता कामठी असे आहे.मृतक महिलेच्या पाठीमागे पती व एक मुलगा व एक मूलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.