संदीप बलविर, प्रतिनिधी
टाकळघाट :- स्थानिक ग्रा प टाकळघाट अंतर्गत बीड गणेशपुरे येथे नुकतेच “हर पल नल, नल से जल” अभियानांतर्गत जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाण्याची टाकी कामाचे भूमिपूजन ग्रा प सरपंच शारदा शिंगारे यांच्या हस्ते पार पडला.
ग्रा प टाकळघाट अंतर्गत बीड गणेशपुर येथे नागरिकांना पाण्यासाठी होत असलेली भटकंती बघता “हर पल नल, घर घर जल “अभियानाद्वारे जलजीवन मिशन अंतर्गत ५२ लक्ष रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करीत यात १.३७ लक्ष लिटर पाण्याचे पाण्याची टाकी,नळ कनेक्शन करीता १२०० मीटर पाईप लाईन चे उदघाटन ग्रा प सरपंच शारदा शिंगारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चरनदास ढोके,विलास शेंदरे,संजय गोटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.