केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
नागपूर :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याची उभारणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग चौक परिसरातील मुख्यप्रशासकीय इमारातीमध्ये होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तंजावर येथील प्रिंस शिवाजी राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थित आज या पुतळ्याचे भूमीपूजन संपन्न झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे हे शताब्दी वर्ष आहे. या शताब्दी वर्षानिमीत्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती मार्फत हा पुतळा उभारला जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा सिंहासनारूढ पुतळा असेल असा दावा करण्यात आला आहे. आज या भूमिपूजन समारंभाला स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले, भूमिपूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, आमदार सर्वश्री अनिल देशमुख, मोहन मते, अभिजीत वंजारी, प्रविण दटके, माजी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, बबनराव तायवाडे यांच्यासह विद्यापीठाचे तसेच स्मारक समितीचे पदाधिकारी व सदस्यव विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सकाळी 10.45 वाजता मुख्यभूमिपूजन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर या भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त देशपांडे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुतळा उभारणीचे काम लोकसहभागातून केले जाणार आहे. नागपूर विद्यापीठाशी संबंधीत माजी विद्यार्थ्यांनी समाजातील दानशून व्यक्तिंनी लोकसहभागाच्या या कार्यात मदत करण्याचे आवाहन स्मारक समितीने केले आहे.असा असेल पुतळा
छत्रपती शिवरायांचा विद्यापीठ पसिरात उभा राहणारा पुतळा भव्य असेल अशी माहिती यावेळी स्मारक समितीने दिली आहे. पुतळ्याच्या चुबतऱ्यांची लांबी 20 फूट, रूंदी 15 फूट, उंची 9 फूट असेल तर या चबुतऱ्यांवर उभा राहणारा सिंहासनारूढ पुतळा 32 फूट उंचीचा असेल त्यावरील छत्र 7 फूट उंचीचे असेल. संपूण ब्राँझ धातूने बांधला जाणारा हा पुतळा 10 हजार किलोग्रॅम वजनाचा असेल. प्रसिध्द मुर्तिकार सोनल कोहाड हे शिल्प साकारणार आहे.