नागपूर :- वर्धा रोडवरील डोंगरगाव जवळ असलेल्या सुकळी येथे दि महाबोधी धम्मदूत सोसायटीला दान मिळालेल्या जागेवर अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रदेश सल्लागार भदंत प्रियदर्शी महास्थवीर व भदंत डॉ. धमोदय महास्थवीर, भदंत कुशलधम्मा महास्थवीर, भन्ते बुद्धपाल, भंते विनय कीर्ती, भन्ते गौतम पाल, सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेवडे, भारती खरे, प्रकाश बौद्ध, पं स खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत विहाराचे भूमिपूजन, बोधीवृक्ष रोपण व पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.
बुद्धविहार बांधकामासाठी ही जागा उपासिका लीला रघुनाथ साळवे (बेझनबाग, नागपूर) व पंढरी केदार यांनी दि महाबोधी धम्मदूत सोसायटी चे भन्ते मोग्गलायन यांना दानपत्राद्वारे दान केलेली आहे. या जागेवर मूलगंध बुद्ध विहार व मूलगंध कुटी बांधण्यात येईल. त्यासाठी दान दात्यांनी पुढे यावे असे आवाहन मुख्य अतिथी म्हणून अखिल भारतीय भिक्खु संघाचे सल्लागार व विदर्भ प्रांत अध्यक्ष भन्ते प्रियदर्शी व सचिव डॉक्टर भदंत धम्मोदय यांनी केले.
कार्यक्रमाला राजू शेवडे, गौतम शेवडे, जानबाजी बोंधाडे, अनिल लखोटे, प्रकाश शेवडे, प्रवीण शेवडे, रंजना शेवडे, मंदा शेवडे, शीला बोंधाडे, सीमा लखोटे आदी प्रमुख कार्यकर्त्यांसहित परिसरातील बरीच कार्यकर्ता मंडळी उपस्थित होती.