मुंबई :- सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे राज्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. या प्रकल्पांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी, दि. २५ फेब्रुवारी रोजी दुरदृष्य प्रणालीद्वारे विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य व कुटुंब कल्याण आणि रसायने व खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी व्यवहार राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रो. एस. पी. बघेल, आयुष आणि महिला व बाल विकास राज्यमंत्री मुंजपरा महेंद्रभाई, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव नवीन सोना, आयुक्त धीरज कुमार दुरदृष्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि पाहण्यासाठी https://pmindiawebcast.nic.in या लिंकला क्लिक करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणाऱ्या पीएम-अभिम अंतर्गत आरोग्य संस्थांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण
भूमिपूजन (PM-ABHIM) क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक
जिल्हा रुग्णालय, जि. पुणे – १०० खाटा, जिल्हा रुग्णालय, जि. अहमदनगर ५० खाटा, जिल्हा रुग्णालय, जि. बुलढाणा – ५० खाटा, जिल्हा रुग्णालय, जि. बीड – ५० खाटा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, जि. नंदुरबार – ५० खाटा (एकूण खर्च – रु. १३५.०५ कोटी)
पीएम-अभिम अंतर्गत इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅब
जिल्हा रुग्णालय, जि. अमरावती (एकूण खर्च – रु. १.२५ कोटी),
राष्ट्रीय आरोग्य अभियान
मुख्य इमारत आणि १४ स्टाफ क्वार्टर – प्रा. आ. केंद्र, करजगाव ता. चांदूरबाजार जि. अमरावती, मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, जैताने ता. साक्री जि. धुळे, मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर प्रा. आ. केंद्र, शिराळा ता. अमरावती जि. अमरावती, जिल्हा वेअरहाऊस, मिटींग, डीपीएमए ऑफिस, जि. चंद्रपूर, स्टाफ क्वार्टर – प्रा.आ.केंद्र, ताडली ता. चंद्रपूर जि. चंद्रपूर, मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर प्रा.आ. केंद्र, गव्हाळी, ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार, मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, सावदा ता. रावेर जि. जळगाव, मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, किनगाव ता. यावल जि. जळगाव (एकूण खर्च – रु. ७७.९४ कोटी)
राष्ट्रीय आयुष अभियान : नवीन आयुष रुग्णालय इमारत बांधकाम, पुणे (एकूण खर्च – रु. ८.९९ कोटी)